जॉन्सन प्रस्तुत ‘लोकमत हेल्दी बेबी स्पर्धे’ला उदंड प्रतिसाद : बालकांच्या संगोपनाविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शननागपूर : आईवडिलांच्या कडेवर बसून प्रेमळ स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या, विविध खेळण्यामध्ये रमलेल्या, मनसोक्त बागडणाऱ्या आणि आपल्या लोभस हास्याने भुरळ पाडणाऱ्या चिमुकल्यांच्या किलबिलाटात शनिवारी पालक चिंब भिजले. निमित्त होते जॉन्सन बेबी प्रायोजित व इंडियन अकॅडमी आॅफ पीडियाट्रिक्सच्या (आयएपी) सहकार्याने आयोजित लोकमत सुदृढ बालक स्पर्धेचे. या स्पर्धेला नागपूरकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. गुटगुटीत आणि निरोगी बालकांचे कौतुक आणि त्यांच्या आरोग्याविषयी जागृती वाढविण्यासाठी आयोजित या स्पर्धेत पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या स्पर्धेला अनमोल बचपन स्कूलचे विशेष सहकार्य मिळाले.ंं सुदृढ बालक म्हणजे फक्त गुटगुटीत किंवा उंची, वजन योग्य असणारे बालक नाही, तर ज्या बालकांचा मानसिक आणि सामाजिक विकास योग्य पद्धतीने होतो आहे असे बालक. सामाजिक शिष्टाचार, स्वावलंबन आदी सर्व गुण लहानपणापासूनच बालकांमध्ये रु जवणे महत्त्वाचे असते. म्हणूनच ही सुदृढ बालकर् (हेल्दी बेबी) स्पर्धा, फक्त स्पर्धा नव्हती तर मुलांच्या सर्व प्रकारच्या विकासाची ती एक प्रक्रि या होती. झाशी राणी चौक, सीताबर्डी येथील माहेश्वरी सभागृहात आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने झाले. इंडियन अकॅडमी आॅफ पीडियाट्रिक्सचे (आयएपी) अध्यक्ष डॉ. आर.जे. पाटील. संयुक्त सचिव डॉ. ऋषि लोढया, जॉन्सनचे व्यवसाय व्यवस्थापक भूपेश मालाडकर, नागपूर फिल्ड मॅनेजर अभिजित गौरखेडे, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंग, लोकमत ग्रुपचे इव्हेंट हेड नितीन नौकरकर उपस्थित होते. बालकांच्या या कौतुक सोहळ्याला सकाळी ८ वाजेपासून स्पर्धेच्या ठिकाणी पालकांनी आपल्या चिमुकल्यांसह गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी लहानग्यांसाठी विविध खेळण्याची व्यवस्था करण्यात आली होती. चॅर्ली चॅप्लिन, गणपतीचे रूप मुलांना भेटून हसवित होते. त्यामुळे पालकांचा आनंद द्विगुणित झाला होता. कार्यक्रमादरम्यान कुटुंबाचे छायाचित्र काढण्याची व्यवस्था करण्यात आली होती. नोंदणीनंतर प्रत्येक बालकासाठी जॉन्सनतर्फे हेल्थ किट देण्यात आली. स्पर्धा बालकाच्या वयानुसार तीन गटात घेण्यात आली. यात एक वर्षांपेक्षा कमी, एक ते तीन वर्षे आणि तीन ते पाच वर्षे. व्यवस्थेच्या दृष्टीने या तिनही गटातील तपासणीची व्यवस्था तीन कक्षात करण्यात आली होती. येथे डॉक्टरांनी एक-एक करून मुलांची तपासणी केली आणि पालकांना त्याच्या देखभालीविषयीची महत्त्वाची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयएपीचे सचिव डॉ. गिरीश चरडे, डॉ. आशीष वैद्य, डॉ. उज्मा, डॉ. हर्ष, डॉ. हरिहर लांबट, डॉ. समित उमाटे, डॉ. रश्मी पिंपळकर, डॉ. विशाखा महाजन, डॉ. नेहा पटेल, डॉ. पुनम कपूर, डॉ. पल्लवी मोहतुरे, डॉ. प्रीती गोलदार, डॉ. अंकिता सपाटे, डॉ. चेतन दीक्षित, डॉ. भूपेंद्र चांदे, यांच्यासह परिचारिका निर्मला तळवेकर, चक्रधर लंगडे, सुप्रिया येडे, स्वाती शिवणकर, प्रीती निनावे, दर्शना भोंगाडे, तेजस्विनी तापुळकर, सुवर्णा पिसुडे, सरोज महरवाडे, गौरी गेडाम, अंजली डहाके, काजल वासनिक, प्रणाली घरडे, मल्लिका गौरकर, दीपिका मांढरे, शशिकला वाघउके, वैशाली हिरडे यांनी परिश्रम घेतले. पुरस्काराचे वितरण आयएपीचे अध्यक्ष आर.जे. पाटील, जॉन्सनचे भूपेश मालाडकर, अनमोल बचपन स्कूलचे संचालक नीलोफर मेमन, साफोरा मेमन, नाजिया मेमन मो. जुनैद मेमन, आयएपीचे सचिव डॉ. गिरीश चरडे, डॉ. आशीष वैद्य, डॉ. प्राजक्ता कडुस्कर, नितिन नौकरकर यांच्या हस्ते करण्यात आले. संचालन नेहा जोशी आणि रेड एफएमचा सौरभ पाकडे यांनी केले.
चिमुकल्यांच्या लोभस हास्याने जिंकले हृदय
By admin | Updated: July 5, 2015 02:56 IST