शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हार्ट अटॅकचे प्रमाण १२५ टक्क्यांनी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:18 IST

युवा वर्ग देशाचा मुख्य आधारस्तंभ आहे. मात्र, अयोग्य जीवनशैली व वाढत्या व्यसनामुळे त्यांच्यात हृदयरोग बळावत चालला आहे, ही चिंतेची बाब आहे.

ठळक मुद्देसुनील वाशीमकर : कार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडियाचे पदग्रहण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : युवा वर्ग देशाचा मुख्य आधारस्तंभ आहे. मात्र, अयोग्य जीवनशैली व वाढत्या व्यसनामुळे त्यांच्यात हृदयरोग बळावत चालला आहे, ही चिंतेची बाब आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास २०२५ पर्यंत तरुणांमध्ये हृदय विकाराचा झटका येण्याचे प्रमाण १२० ते १२५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, असे मत कार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया, विदर्भ शाखेचे नवे अध्यक्ष डॉ. सुनील वाशीमकर यांनी येथे व्यक्त केले.कार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया विदर्भ शाखेच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी सकाळी रामदासपेठ येथील खासगी हॉटेलमध्ये थाटात पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायधीश सुनील शुक्रे, पद्मश्री डॉ. मॅथ्यू सॅम्युएल कलारिक्कल, हृदयरोपण शल्यचिकित्सक डॉ. अन्वय मुळे आदी उपस्थित होते. डॉ. मुळे म्हणाले, देशात हृदयरोगाचे दोन कोटीवर रुग्ण आहेत. यात दरवर्षी ६० लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. धक्कादायक म्हणजे, अनेकांना आपण हृदयरोगाचे रुग्ण आहोत हे हृदय विकाराचा झटका (हार्ट अटॅक) आल्यानंतरच कळते. यामुळे या आजाराविषयी व्यापक जनजागृती होऊन योग्य उपचार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.विदर्भात हृदय प्रत्यारोपणासाठी प्रयत्नडॉ. वाशीमकर म्हणाले, मेंदू मृत व्यक्तीकडून फार कमी प्रमाणात अवयव दान होते. याला गती देण्यासाठी कार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया व विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अवयव दानाच्या जनजागृतीवर भर दिला जाणार आहे. सोबतच विदर्भात हृदय प्रत्यारोपणासाठी आवश्यक पायाभूत सोई उभ्या करण्यासाठी व शल्यचिकित्सक निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.अशी आहे नवी कार्यकारिणीकार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया विदर्भ शाखेच्या नव्या कार्यकारिणीत अध्यक्ष डॉ. सुनील वाशीमकर, सचिव डॉ. अनिल जवाहिरानी, आश्रयदाता डॉ. हरीशंकर भार्गव, निर्वाचित अध्यक्ष डॉ. अनुज सारडा, माजी अध्यक्ष डॉ. राम घोडेस्वार, सचिव डॉ. पंकज हरकूट, उपाध्यक्ष डॉ. निकुंज पवार, डॉ. काशीफ सय्यद, सहसचिव डॉ. विपुल सेता, डॉ. स्वप्निल देशपांडे, कोषाध्यक्ष डॉ. दीपक साने आदींचा सहभाग आहे. पदग्रहण सोहळ्याला डॉ. वाय. बन्सोड, डॉ. माधुरी होले, डॉ. पी.पी. जोशी, डॉ. मनीष श्रीगिरीवार आदी उपस्थित होते.