उच्च न्यायालयात सोमवारपासून नवीन रोस्टर लागू होणार आहे. या अर्जावर नवीन रोस्टरनुसार सुनावणी व्हावी याकरिता शुक्रवारची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. यापूर्वी न्यायालयाने सदर प्रकरणात ठाकूर यांच्या शिक्षेवर स्थगिती देऊन त्यांना जामीन मंजूर केला आहे. ठाकूर यांना आता दोषसिद्धीवर स्थगिती हवी आहे. विरोधी नेते या प्रकरणावरून राजकारण करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
यशोमती ठाकूर यांच्या अर्जावरील सुनावणी तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:06 IST