६४०० आक्षेप : तक्रारकर्त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित रहावेनागपूर : नागपूर महानगर प्रारूप विकास आराखड्यावर (मेट्रोरिजन) तब्बल ६४०० आक्षेप घेण्यात आले होते. शनिवार, ८ आॅगस्टपासून या आक्षेपांवर प्रत्यक्षात सुनावणी होणार आहे. शासनाने नुकतेच नेमलेली समिती सुनावणी घेईल. पहिल्या टप्प्यातील कामठी तालुक्यातील गावांची सुनावणी होणार होणार असून त्यासाठी नासुप्रने वेळापत्रक जाहीर केले आहे. नासुप्रच्या अंबाझरी परिसरातील मेट्रो विभागाच्या कार्यालयात ८ आॅगस्टपासून सकाळी ११ ते ६ वाजेपर्यंत सुनावणी घेतली जाईल. नासुप्रने २६ फेब्रुवारी महानगर प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला होता. त्यावर मेट्रोरिजनमध्ये येणाऱ्या ९ तालुक्यातील ७२१ गावांतील ६४०० नागरिकांनी आक्षेप नोंदविले आहेत. या आक्षेपांच्या सुनावणीसाठी आठवडी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तक्रारकर्त्याला सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित रहायचे आहे. ज्यांना सुनावणीचे पत्र मिळाले नाही अशांची सुनावणी १७ आॅगस्ट रोजी ११ वाजतापासून करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)अशी आहे समितीसमितीमध्ये या सदस्यांचा समावेश आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेश बिनिवाले, नगररचना विभागाचे माजी सहसंचालक अ. चं. मुंजे, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विजय कापसे, नासुप्र सभापती श्याम वर्धने, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नगररचना सहसंचालक एन. एस. अढारी.
मेट्रोरिजनच्या आक्षेपांवर आजपासून सुनावणी
By admin | Updated: August 8, 2015 03:04 IST