शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
5
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
6
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
7
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
8
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
9
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
10
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
11
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
12
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
13
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
14
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
15
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
16
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
17
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
18
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
20
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी

तिघांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ३१ रोजी सुनावणी

By admin | Updated: May 27, 2016 02:49 IST

नऊ हजार कोटी रुपयांच्या डब्बा व्यापारप्रकरणी तीन आरोपी व्यापाऱ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले असून,

डब्बा व्यापारप्रकरण : सरकारचे उत्तर दाखलनागपूर : नऊ हजार कोटी रुपयांच्या डब्बा व्यापारप्रकरणी तीन आरोपी व्यापाऱ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले असून, त्यांच्या अर्जांवर प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला यांच्या न्यायालयात ३१ मे रोजी सुनावणी होणार आहे. दिनेश भंवरलाल सारडा रा. रामदासपेठ, अंकित ओमप्रकाश मालू रा. वाठोडा आणि विनय ओमप्रकाश अग्रवाल रा. सूर्यनगर, अशी आरोपी व्यापाऱ्यांची नावे आहेत. या तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जातच तात्पुरत्या अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने नकार देऊन सरकार पक्षाला उत्तर दाखल करण्यासाठी नोटीस जारी केली होती. त्यावर गुरुवारी सरकार पक्षाकडून न्यायालयात उत्तर दाखल करून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले जावे, अशी मागणी करण्यात आली. न्यायालयाने तिघांच्याही अर्जावर ३१ मे रोजी सुनावणी निश्चित केली आहे. १३ मे रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी विविध व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर धाडी घालून कोट्यवधींचा डब्बा व्यापार उजेडात आणला होता. २० जणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४६८, ४७१, ४७७ (अ), ४२०, १२० (ब), २०१ आणि सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन अ‍ॅक्टच्या कलम २३(१)अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी कुशल किशोर लद्दड, विजय चंदूलाल गोखलानी, नीरज ओमप्रकाश अग्रवाल, प्रीतेश सुरेशकुमार लखोटिया यांच्यासह १३ जणांना अटक करण्यात आलेली असून, त्यांना न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावण्यात आलेला आहे. ते सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत. अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतलेल्या या तीन आरोपींव्यतिरिक्त बरेच आरोपी फरार आहेत. न्यायालयात सरकारच्या वतीने मुख्य जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे आणि अतिरिक्त सरकारी वकील अजय माहूरकर काम पाहत आहेत.(प्रतिनिधी)