शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील आरोग्यसेवा चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:11 IST

- अशोक बेलखोडे यांचा सी.मो. झाडे फाउंडेशनतर्फे सन्मान लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्यसेवा अद्यापही ...

- अशोक बेलखोडे यांचा सी.मो. झाडे फाउंडेशनतर्फे सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्यसेवा अद्यापही पोहोचलेल्या नाहीत. जिथे पोहोचल्या तेथील आरोग्यसेवेची दशा चिंताजनक असल्याची भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक बेलखोडे यांनी व्यक्त केली.

सी.मो. झाडे फाउंडेशनचा उपक्रम असलेल्या श्री. सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने दिला जाणारा डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार नांदेडच्या आदिवासी बहुल किनवट तालुक्यात गेल्या तीन दशकांपासून सेवा देणारे डॉ. अशोक बेलखोडे यांना प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराला उत्तर देताना, ते बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड. शिवाजीराव मोघे होते तर व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, राजकीय विश्लेषक अशोक वानखडे, सर्वोदयी विचारक ॲड. मा.म. गडकरी, गिरीश गांधी व प्रसिद्ध लेखक लक्ष्मणराव शिरभाते उपस्थित होते.

दुर्गम भागातील व्यक्तीला सर्पदंश झाला तर त्याला महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळत नाही. व्हेंटिलेटरवर असेल तरच या योजनेचा लाभ मिळतो. ही विसंगती कधी दूर होणार, असा सवाल उपस्थित करतानाच डॉ. बेलखोडे यांनी शासकीय सेवेत आलेले अनुभव, भ्रष्टाचार, सरकारी रुग्णालयात रुग्णांची होणारी परवड आदींवर प्रकाश टाकला.