शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य मंत्र्यांना जिल्हा रुग्णालयाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:27 IST

प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय असण्याचा नियम आहे. परंतु नागपुरात जिल्हा रुग्णालयच नाही.

ठळक मुद्देमनोरुग्णालयाची ९ एकर जागा प्रस्तावित : २८.५ कोटी निधीलाही मिळाली आहे मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय असण्याचा नियम आहे. परंतु नागपुरात जिल्हा रुग्णालयच नाही. विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. २८.५ कोटी निधी देण्याचे मान्य झाले. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या ८.९० एकर जागेवर हे रुग्णालय उभे होणार आहे. या संदर्भातील कागदोपत्री कारवाई झाल्याचेही समजते. परंतु आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांना या जिल्हा रुग्णालयाचाच विसर पडल्याचे गुरुवारी दिसून आले. एका प्रश्नावर जिल्हा रुग्णालयासाठी जागाच उपलब्ध नसल्याचे उत्तर दिल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले.राज्यातील बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य मंत्री महत्त्वाच्या आरोग्य केंद्राला भेटी देऊन आढावा घेत आहे. गुरुवारी त्यांनी नागपूरच्या डागा रुग्णालयाची आकस्मिक पाहणी केली. त्यानंतर पत्रपरिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधताना हा प्रकार घडला. विविध राष्टÑीय आरोग्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी जिल्हा रुग्णालय स्थापन करणे आवश्यक असते. परंतु गेल्या चार वर्षांपर्यंत आरोग्य विभागासोबतच प्रशासन याबाबत गंभीर नव्हते. अखेर नागपुरात १०० खाटांचे जिल्हा रुग्णालय स्थापन करण्यास १७ जानेवारी २०१३ रोजी मान्यता मिळाली.रुग्णालयाच्या बांधकामाकरिता प्रादेशिक मनोरुग्णालयाची ८.९० एकर जागा उपलब्ध करून दिली. २९ सप्टेंबर २०१५ रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्यात झालेल्या बैठकीत या रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी एकूण १० एकर जागा उपलब्ध करून देण्यावर चर्चाही झाली.या जागेसाठी ३० सप्टेंबर २०१५ रोजी जिल्हाधिकाºयांना कळविण्यात आले. जागेचे मोजमाप झाले. तसा अहवालही देण्यात आला. रुग्णालयाच्या बांधकामासाठी २८.५ कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली. विशेष म्हणजे, हे रुग्णालय लवकर व्हावे याला घेऊन काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री बावनकुळे यांनी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उमेश नावाडे यांंना धारेवरही धरले होते. असे असताना, नागपूरचे जिल्हा रुग्णालय कुठे रखडले या प्रश्नाला आरोग्य मंत्र्यांनी गंभीरतेने घेतले नाही. जागाच उपलब्ध नसल्याचे टोलवाटोलवीचे उत्तर दिले.