कामठी पोलीस ठाणे : शिबिराचे आयोजननागपूर : कामठी पोलीस ठाण्याच्या आवारात अग्निरेखा फाऊंडेशनच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यात १५० पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. देवराव रडके, पंजाबराव वैद्य, हरिभाऊ महाजन, संतोष अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कंतेवार, पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर, राजेश शर्मा आदी उपस्थित होते. यावेळी बावनकुळे म्हणाले, समाजाततील नागरिकांच्या संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी ही पोलिसांवर सोपविण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. याचा समाजातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पोलीस कर्मचारी हे सुदृढ असणे नितांत गरजेचे आहे. त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी आयोजित करण्यात आलेले सदर शिबिर हा स्तुत्य उपक्रम असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.या शिबिरात १५० पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. विवेक चंदनानी, डॉ. ओमप्रकाश चोबे, डॉ. तमीम फाजली, डॉ. मनीष दीपानी, डॉ. राकेश अग्रवाल, डॉ. संजय भाजीपाले आदींनी सेवा प्रदान केली. यशस्वितेसाठी प्रेमरतन लखोटिया, द्वारकाप्रसाद शर्मा, जमील अन्सारी, सुगचंद छल्लानी, मनोज लखोटिया, दशरथ निनावे, विलास बांगरे, दिनेश गुरव, अनुराग शर्मा, पराग अग्रवाल, द्वारका पारवानी, कपिल पुरोहित, विशाल यादव, संतोष जयस्वाल आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
१५० पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
By admin | Updated: September 7, 2014 00:54 IST