शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात १२०० डिलिव्हरी बॉईजची आरोग्य तपासणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 23:32 IST

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी घरपोच अन्न सेवा पुरविणाऱ्या १२०० डिलिव्हरी बॉईजच्या आरोग्य तपासणीला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ३०० वर बॉईजची तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देपहिल्याच दिवशी ३०० मधून एकही रुग्ण नाही : स्वच्छता व अंतर पाळण्यावरही मार्गदर्शन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी घरपोच अन्न सेवा पुरविणाऱ्या १२०० डिलिव्हरी बॉईजच्या आरोग्य तपासणीला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ३०० वर बॉईजची तपासणी करण्यात आली. यासाठी आरोग्य विभागाच्या पाच डॉक्टरांची चमू तैनात करण्यात आली आहे. आमदार निवासात तपासण्यात आलेल्या या बॉईजमध्ये यातील एकालाही सर्दी, खोकला, तापाची लक्षणे आढळून आलेली नाहीत. नागपुरात ‘लॉकडाऊन’ असलेतरी घरपोच अन्न सेवा देणाऱ्या दोन कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजला यातून वगळण्यात आले आहे. यांच्या मार्फत मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून यांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार घरपोच अन्न सेवा पुरविण्यात अग्रेसर असलेल्या झोमॅटो व स्वीगीच्या ३०० डिलिव्हरी बॉईजला सिव्हील लाईन्स येथील आमदार निवासाच्या सभागृहात बोलविण्यात आले होते. यांच्या तपासणीसाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून पाच डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. वरिष्ठ डॉ. डॉक्टर नितीन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात डॉ.सरल देशमुख, डॉ. प्रज्ञा रामटेके, डॉ. अफसान तब्बसूम, डॉ. प्रशांत गिरी, डॉ. शिशिर गोस्वामी व डॉ. प्रशांत हिवरकर आदींनी या डिलिव्हरी बॉईजची तपासणी केली. तपासणीपूर्वी त्यांच्याकडून एक अर्जही भरुन घेण्यात आला. तपासणी नंतर डॉक्टरांनी त्यांना मार्गदर्शनही केले. हॉटेलमध्ये अन्नाचे पॅकेट घेण्यापूर्वी हाताची स्वच्छता, ग्लोव्हज व मास्क घालण्याचे महत्त्व, घरपोच अन्नाचे पॅकेट देताना विशिष्ट अंतर पाळण्याची खबरदारी घेण्यासही सांगितले. रोख स्वरुपात पैसे न घेता ऑनलाईन पेमेंट घेण्याच्या आदी महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आल्या. पुढील काही दिवस ही तपासणी सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे, रोजचा तपासणीचा अहवाल जिल्हाधिकारी आरोग्य विभागाला सादर करावयाचा आहे. ही मोहीम आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय सेलोकर राबवित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याZomatoझोमॅटो