शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

१९५ नागरिकांची आराेग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:10 IST

माेवाड : डिगडाेह (ता. हिंगणा) येथील लता मंगेशकर हाॅस्पिटलच्यावतीने माेवाड (ता. नरखेड) येथील नगर परिषद उच्च माध्यमिक शाळेच्या आवारात ...

माेवाड : डिगडाेह (ता. हिंगणा) येथील लता मंगेशकर हाॅस्पिटलच्यावतीने माेवाड (ता. नरखेड) येथील नगर परिषद उच्च माध्यमिक शाळेच्या आवारात राेगनिदान व रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात १९५ नागरिकांची माेफत आराेग्य तपासणी करण्यात आली असून, १५ तरुणांनी रक्तदान केले. यातील ११० रुग्णांची पुढील उपचारासाठी निवड करण्यात आली असून, त्यांच्यावर लता मंगेशकर हाॅस्पिटलमध्ये माेफत उपचार करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या शिबिरात नागरिकांची बालरोग, अस्थिरोग, नाक, कान व घसा, दंतरोग, नेत्ररोग यासह इतर विभागातील तज्ज्ञ व वरिष्ठ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. गरजूंना माेफत औषधेही देण्यात आली. पुढील उपचारासाठी निवड करण्यात आलेल्या ११० रुग्णांवर माेफत शस्त्रक्रिया केली जाणार असून, त्यांच्याकडून जनरल वाॅर्ड शुल्क घेतला जाणार नाही. भरती करण्यात आलेल्या रुग्णांना रक्ताची तपासणी, एमआरआय, सिटी स्कॅन व इतर निदानासाठी आवश्यक असलेल्या टेस्ट नि:शुल्क आहे. त्यांना आयुष्मान भारत योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यात येईल. ओपीडीमध्ये रक्त व इतर सर्व प्रकारच्या चाचण्यांवर ५० टक्के सूट देण्यात येईल, असेही सांगण्यात आले. याप्रसंगी काेराेना संक्रमण काळात नागरिकांना सेवा प्रदान करणाऱ्यांचा गाैरव करण्यात आला. उद्घाटन माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून दिनकर राऊत, नगर पालिकच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत, सुरेश खसारे, रवींद्र वैद्य, डॉ. सुधीर साठोणे, दीपक बेले, पुरुषोत्तम बागडे, इस्माईल शेख, रवी माळाेदे, हिराचंद कडू, नामदेव वाडबुधे, मुख्याध्यापक दारोकर, फिरोज दिवाण, पुष्पा लुंगे, रमेश राजगुरू, डॉ. देवके, डॉ. किशोर ढोबळे, डॉ. केतन दागडिया, डाॅ. रामटेके, मीना पवार, श्यामल मेंढे, बी. डी. मांढळे उपस्थित हाेते. यशस्वितेसाठी लेखराज बोरकर, गोलू डुहिजोड, ललित खंडेलवाल, सुनील चुऱ्हे, दिलीप बनाईत, रमेश जिचकार यांनी सहकार्य केले.