शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शाळासिद्धी व युडायसने वाढविली मुख्याध्यापकांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:07 IST

नागपूर : राज्यात १ मेपर्यंत कडक लॉकडाऊन असताना शिक्षण विभागाने शाळांना शाळासिद्धी व युडायसमध्ये २६ एप्रिलपर्यंत माहिती भरण्याचे फर्मान ...

नागपूर : राज्यात १ मेपर्यंत कडक लॉकडाऊन असताना शिक्षण विभागाने शाळांना शाळासिद्धी व युडायसमध्ये २६ एप्रिलपर्यंत माहिती भरण्याचे फर्मान काढले होते. शाळाच बंद असल्याने दिलेल्या मुदतीत माहिती भरणे शक्य झाले नाही.

यू-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये राज्यातील सर्व शाळांची माहिती ऑनलाईन पद्धतीने ३० मे २०२१ पर्यंत संगणकीकृत करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांनी २६ एप्रिलपर्यंत शाळांनी माहिती संगणकीकृत करून देण्याचे आदेश दिल्याने, मुख्याध्यापक व शिक्षक संभ्रमात पडले आहेत. राज्यात कडक लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्यांना फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच बाहेर पडता येते. त्यामुळे माहिती संकलित करण्यासाठी शाळेत कसे पोहोचावे, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. समग्र शिक्षा या योजनेचे पुढील वर्षाचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्याकरिता यू-डायस प्लस प्रणालीमार्फत संगणकीकृत होणाऱ्या माहितीचा उपयोग होतोे. याच माहितीच्या आधारे भारत सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांना अनुदान मंजुरी देण्यात येते. यू-डायस प्लस प्रणालीमधील माहितीचा उपयोग वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी होतो.

शिक्षकांना घरून माहिती भरण्यास अडचण निर्माण होत असल्यामुळे शाळासिद्धी व युडायसमध्ये माहिती भरण्याला मुदतवाढ देण्याची मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मिलिंद वानखेडे यांनी शिक्षण आयुक्त व अप्पर शिक्षण सचिवांना केली.