शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

व्याघ्रहल्ल्यापासून वाचण्यासाठी डोक्यामागे लावा वाघाचे मुखवटे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:32 IST

शेतावर काम करताना किंवा जनावरे चारताना डोक्यामागे वाघाचे मुखवटे लावून काम करण्याचा सल्ला वनविभागाकडून दिला जात आहे. सुंदरबन जंगलात हा प्रयोग यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देनऊ गावांमध्ये वनविभागाचे बॅनर : चित्रांच्या माध्यमातून दिला जातोय सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या आठवडाभरापासून काटोल रोडवरील फेटरी, बोरगाव, येरला, खडगाव, भरतवाडा, माहुरझरी, चिंचोली, दहेगाव, खंडाळा गावांच्या परिसरात वाघ फिरत असल्याच्या चर्चेने दहशत पसरली आहे. गावकरी शेतातवर जायला घाबरत आहे. या परिस्थितीत शेतावर काम करताना किंवा जनावरे चारताना डोक्यामागे वाघाचे मुखवटे लावून काम करण्याचा सल्ला वनविभागाकडून दिला जात आहे. सुंदरबन जंगलात हा प्रयोग यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे.माहितगार सूत्रांच्या मते साधारणत: वाघ निर्जन ठिकाणी माणसावर पाठीमागून हल्ला करतो. शेतात वाकून काम केले जाते. या वाकलेल्या माणसांना पाहून कुणी लहान वन्यजीव असल्याचा भास वाघाला होतो. अशा परिस्थितीतही वाघ पाठीमागूनच हल्ला करतो. त्यामुळे नागरिकांच्या जागृतीसाठी वनविभागाने गावांमध्ये बॅनर लावून संदेश पोहचविणे सुरू केले आहे. वाघाच्या संभाव्य हल्ल्यापासून वाचण्यासाठी शेतात काम करताना दक्षता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी बॅनर आणि होर्र्डींगच्या माध्यमातून गावकऱ्यांना जागृत केले जात आहे.जंगलात एकटे जाण्याऐवजी दोन-तीन जणांच्या गटाने जावे, शेतात काम करताना किंवा तेंदूपत्ता तोडाईसाठी आणि मोहाफुले वेचण्यासाठी झुंडीने जावे, मोठ्या आवाजात बोलावे असा सल्ला दिला आहे.रविवार सकाळी बोरगावमध्ये शिकारीजवळ लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघ असल्याचे आढळले. हा वाघ कळमेश्वरच्या निमजीमधून भटकून या गावांकडे आला असल्याची शक्यता वनअधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग