शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘निसर्गवेडा’ ही बिरुदावली घेऊन ‘ते’ निघाले आपल्या गावाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 02:15 IST

अँकर । मारुती चितमपल्ली यांचे नागपुरातून सोलापूरकडे प्रस्थान - सत्कार समारंभात रंगला आठवणींचा हृद्यसोहळा

नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणे मराठीला नव्या शब्दांची देणगी देणाऱ्यात जर कुणाचे नाव आदराने घेतले जात असेल तर ते मारुती चितमपल्ली यांचे. निसर्गवाटेत अवघे आयुष्य घालविणाºया या मूळ तेलुगू भाषिक निसर्गऋषीने तब्बल एक लाख शब्दमोती मराठी मातीला दिले. वन, वन्यजीव, वनस्पतींची खडान्खडा माहिती त्यांना आहे. त्यांचे हे सगळे संशोधन विदर्भातच झाले असल्याने त्यांना विदर्भाने ‘निसर्गवेडा’ ही बिरुदावली दिली. निसर्गाचा हा सगळा खजिना घेऊन म्हणा वा भविष्याकडे सोपवून ते आपल्या गृहनगराकडे अर्थात सोलापूरकडे प्रस्थान करत आहेत.

वनांच्या अभ्यासात बरीच वर्षे विदर्भात घालविल्यानंतर मारुती चितमपल्ली रविवारी सकाळी नागपुरातून सोलापूरकडे प्रस्थान करत आहेत. आपले उर्वरित आयुष्य ते सोलापूरमध्ये आपल्या पुतण्याकडे घालविणार आहेत. त्यानिमित्ताने शनिवारी शेवाळकर कुटुंबीयांनी विदर्भवासीयांच्या वतीने त्यांच्या प्रस्थान सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. ज्येष्ठ लेखिका आशाताई बगे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी चितमपल्ली यांनी विदर्भातील संशोधनविषयक बºयाच आठवणींना उजाळा दिला. पक्षी, वन्यप्राणी म्हणा वा वनस्पती यांवरील लिखाण असो वा भविष्यवेधी विद्यार्थ्यांना शिकवणी असो यावर पुसटशा आठवणी ते व्यक्त करत होते. नागझिरा येथील वनसंपत्तीने मोहिनी घातल्यावरच आपल्या लिखाणाला नवे वळण मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माहिती विभाग संचालक हेमराज बागूल, आशुतोष शेवाळकर, विजयाताई शेवाळकर, मनीषा शेवाळकर उपस्थित होते.जंगल वाचवणे आता तुमच्या हातात!विदर्भातील वनसंपदेवर भरभरून प्रेम करणाºया मारुती चितमपल्ली यांना विदर्भ सोडणे अत्यंत अवघड आहे, हे त्यांच्या एका भावनिक वाक्यावरून स्पष्ट होत होते. एवढे जंगल कुठेच नाही. ते विदर्भात आहे, ते सांभाळता आले पाहिजे. जंगल वाचवणे आता तुमच्या हातात आहे, या एका वाक्यावरूनच त्यांचा जंगलाविषयीचा लळा लक्षात येतो.