शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

रक्कम घेऊन भूखंड दुसऱ्याला विकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:08 IST

नागपूर : तीन वर्षांपूर्वी भूखंड विकण्याचा सौदा करून १९ लाख रुपये घेणाऱ्या महिलेने अलीकडे हा भूखंड दुसऱ्याला विकून टाकला. ...

नागपूर : तीन वर्षांपूर्वी भूखंड विकण्याचा सौदा करून १९ लाख रुपये घेणाऱ्या महिलेने अलीकडे हा भूखंड दुसऱ्याला विकून टाकला.

स्वाती सुधीरचंद्र चटर्जी असे आरोपी महिलेचे नाव आहे. फिर्यादी राजेश रामकिशन यादव हे चंदन नगरात राहतात. सक्करदरा पोलीस ठाण्यात त्यांनी गुरुवारी नोंदविलेल्या तक्रारीनुसार, आरोपी स्वाती चॅटर्जी यांनी २३ मार्च २०१८ ला यादव यांच्यासोबत धंतोलीतील राहते घर आणि भूखंड विकण्याचा सौदा केला होता. त्यापोटी चॅटर्जी यांनी यादव यांच्याकडून १९ लाख रुपये घेतले होते. या संबंधाने सक्करदरा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात रीतसर खरेदी-विक्रीचा व्यवहारही झाला होता. यानंतर चटर्जी यांनी हा भूखंड दुसऱ्याला विकून यादव यांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर काही दिवसांपूर्वी यादव यांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर गुरुवारी या प्रकरणात चॅटर्जी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.

---

वडिलांना वाचविण्याच्या प्रयत्नात मुलाचा मृत्यू

नागपूर : वृद्ध वडिलांना वाचविण्याच्या प्रयत्नात गंभीररीत्या भाजलेल्या मुलाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. प्रवीण दशरथ गाटकीने (वय ४९) असे मृताचे नाव आहे.

प्रवीण त्यांच्या परिवारासह महालमधील शिवाजीनगर येथे राहत होते. ६ मे च्या रात्री ९.३० ते १० च्या दरम्यान प्रवीण यांचे वृद्ध वडील दशरत गाटकीने (वय ७५) यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले. वडिलांना वाचविण्यासाठी प्रवीण धावले. त्यांना विझविण्याचा प्रयत्नांत प्रवीण गंभीररीत्या भाजले गेले. दोघांनाही रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथे गुरुवारी मध्यरात्रीनंतर प्रवीण यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कोतवाली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

--

दोघांनी लावला गळफास

नागपूर : शहरातील वेगवेगळ्या भागात दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली.

गिट्टीखदानमधील सुरेंद्रगड परिसरात राहणारे यशवंत येटे (वय ६७) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

दुसरी घटना यशोधरा नगरातील आहे. नागसेनवन नगरात राहणारे पांडुरंग गंगाराम लांडे (वय ७५) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीवरून यशोधरा नगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

---

आकस्मिक मृत्यू

नागपूर-वर्धा मार्गावरील न्यू स्नेह नगरात राहणारे सचिन प्रभाकर हिवरे (वय ३३) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला.