शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील महिलेला विकले व तिच्या मुलीवर केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 11:34 IST

Rape, trafficking, Nagpur News मानवी तस्करीत गुंतलेल्या एका नराधमाने साडेतीन महिन्यांपूर्वी निराधार महिलेला नोकरीचे आमिष दाखवून मध्य प्रदेशात विकले. तिची अल्पवयीन मुलगी स्वत:च्या घरी ठेवून घेतली आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानवी तस्करीत गुंतलेल्या एका नराधमाने साडेतीन महिन्यांपूर्वी निराधार महिलेला नोकरीचे आमिष दाखवून मध्य प्रदेशात विकले. तिची अल्पवयीन मुलगी स्वत:च्या घरी ठेवून घेतली आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला. प्रचंड संतापजनक अशी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध लावण्यासाठी वेगवेगळी पथके कामी लावली आहेत.सुशील पैसाडील असे या नराधमाचे नाव असून तो अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. घटस्फोटित, निराधार आणि गरीब महिला, मुलींना आपल्या जाळ्यात ओढून तो त्यांना प्रारंभी मदत करतो. नंतर नोकरीचे आमिष दाखवतो. त्याच्या जाळ्यात अडकलेल्या महिला, मुलीला परप्रांतात नेऊन विकतो. अजनीतील एक विवाहित महिला जूनमध्ये त्याच्या संपर्कात आली होती. तिला १४ वर्षांची मुलगी आणि १० वर्षांचा मुलगा आहे. पती वेगळा राहतो. त्यामुळे मुलांचे शिक्षण आणि उदरनिर्वाहासाठी ही महिला मिळेल ते काम करायची. आरोपी सुशीलने तिला नोकरीचे आमिष दाखवले. तुझ्या मुलांचे शिक्षण आणि सांभाळ करतो, असे सांगून मुलगी आणि मुलाला स्वत:च्या घरी ठेवले तर महिलेला त्याने मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे नेले. त्या महिलेची मुलगी सातवीत शिकते. आरोपीची पत्नी घराबाहेर गेल्याची संधी साधून तो या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करायचा. तीन महिन्यात त्याने तिच्यावर अनेकदा पाशवी बलात्कार केला. आई-वडील कोणीच जवळ नसल्यामुळे पीडित मुलगी जीवाच्या धाकाने या नराधमाचे अत्याचार सहन करत होती. आरोपीची पत्नीदेखील त्याबाबत काही बोलत नव्हती.असा झाला उलगडागिट्टीखदानमधील दोन तरुणींना एका टोळीने मध्य प्रदेशात नेऊन निकले. या घटनेचा बोभाटा झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना शोधणे सुरू केले. त्यात आरोपी सुशील पैसाडील याचेही नाव आले. त्यामुळे पोलीस रविवारी त्याच्या अजनीतील घरी पोहोचले. त्याच्या घराची झडती घेतली असता अत्याचारग्रस्त मुलगी आणि तिचा लहान भाऊ आढळले. ती त्याची मुले नसतानादेखील त्याच्या घरी राहत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.या नराधमाने त्या अल्पवयीन मुलीवर स्वत: बलात्कार करतानाच तिला आपल्या मित्राच्याही हवाली केले. त्यामुळे त्याच्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केल्याचा दुसरा संतापजनक पैलू उघड झाला आहे.

 

टॅग्स :Human Traffickingमानवी तस्करी