शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
3
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
4
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
5
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
6
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
7
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
8
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
9
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
10
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
11
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
12
'जुम्मा गर्ल' किमी काटकर आठवतेय का? लेटेस्ट फोटो आला समोर, ओळखणं झालंय कठीण
13
’सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेत आहेत’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
14
रिलेशिनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले गौरव कपूर-कृतिका कामरा, व्हिडीओ व्हायरल
15
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
16
Gujarat Flyover Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला! ४ कामगार गंभीर जखमी, एक बेपत्ता
17
"माझ्या एका सिगारेटने दिल्लीच्या प्रदूषणात फरक पडणार नाही"; TMC खासदाराचं भाजपाला प्रत्युत्तर
18
Rahul Gandhi: "लाखो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे" लोकसभेत राहुल गांधींचं महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य!
19
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
20
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
Daily Top 2Weekly Top 5

तो लढला देशासाठी, ती लढली पोटासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 11:13 IST

१९४४ ला नागपूर जिल्ह्यातील कामठी गोराबाजार येथील एक युवकही भारतीय वायुसेनेत भरती झाला. बन्सीलाल जानोरे त्याचे नाव. त्यावेळी देशसेवेने तो झपाटलेला होता. तो देशासाठी लढला, युद्धात गोळीही लागली, तरीही तो लढत राहिला.

ठळक मुद्देदुसऱ्या महायुद्धातील सैनिकाच्या विधवेने जिंकली संघर्षमय लढाईजिल्हा प्रशासन करणार मदत

जितेंद्र ढवळे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर/मनसर : देशासाठी दुसऱ्या महायुद्धात अनेक योद्ध्यांनी प्राणांची आहुती दिली. सरकारच्या आवाहनाला साद देत १९४४ ला नागपूर जिल्ह्यातील कामठी गोराबाजार येथील एक युवकही भारतीय वायुसेनेत भरती झाला. बन्सीलाल जानोरे त्याचे नाव. त्यावेळी देशसेवेने तो झपाटलेला होता. तो देशासाठी लढला, युद्धात गोळीही लागली, तरीही तो लढत राहिला. कालांतराने या योद्ध्याचे आजारपणामुळे निधन झाले.मात्र देशसेवेसाठी लढण्याची प्रेरणा देणारी त्याची पत्नी आजतागायत पेन्शनसाठी लढा दिला. कमलाबाई जानोरे त्यांचे नाव. ८१ वर्षांच्या या अशिक्षितबाईने गावातील ग्रामपंचायतचा आधार घेत पेन्शनची लढाई लढली आणि ती जिंकलीही. या लढाईत नागपूरच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी त्यांना बळ दिले.१ सप्टेंबर १९३९ ते २ सप्टेंबर १९४५ या काळात दुसरे महायुद्ध झाले. या महायुद्धात सहभागी होण्यासाठी बन्सीलाल जानोरे १३ सप्टेंबर १९४४ साली भारतीय वायुसेनेत भरती झाले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर सरकारने त्यांना ३ मे १९४८ रोजी सेवामुक्त केले. यानंतर ते नागपूर येथे भाड्याने राहत होते. त्या काळात सैनिकांना पेन्शन मिळत नसल्याने त्यांनी स्वत:चा उदरनिर्वाह भाड्याच्या खोलीत राहून अर्धांगिनीसोबत केला.कालांतराने आजारपणामुळे १६ सप्टेंबर १९८३ ला बन्सीलाल यांचे निधन झाले. या घटनेला आज ३५ वर्षे झाली आहेत. मुलबाळ नसल्याने पतीच्या निधनानंतर पोटाच्या लढाईसाठी कमलाबाई कधी फळ तर कधी भाजीपाला विकून दोेनवेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी काम करीत राहिल्या. मात्र वय साथ देत नसल्याने त्यांनी १० वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील मनसर येथे भावाकडे आश्रय घेतला. कधी भावाकडे तरकधी मनसर येथील वृद्धाश्रमात कमलाबाई राहातात. आयुष्याच्या उत्तरार्धात जगण्यासाठी सरकारची मदत मिळावी यासाठी कमलाबाईने नातेवाईकांच्या मदतीने नागपूर जिल्ह्यात सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले. यात त्यांच्याजवळ असलेल्या एका प्रमाणपत्राच्या आधारावर या महिलेला सरकारची कोणतेही मदत झाली नसल्याची बाब जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांच्या लक्षात आली. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी नागपूर यांच्याकडे कमलाबाईच्या मदतीसाठी प्रस्ताव पाठविला आणि तो जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूरही केला. लवकरच कमलाबाईला थकबाकीसह सरकारची मदत मिळणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांनी दिली.वन रँक वन पेन्शनवर देशात वादंग उठले असताना नागपूर जिल्हा प्रशासनाने या महिलेच्या हक्कासाठी केलेली लढाईही तिकतीच प्रेरणादायी आहे.

आजाराने ग्रस्त कमलाबाईकमलाबाई सध्या आजाराने ग्रस्त आहेत. कधी मनसर येथील वृद्धाश्रमात तरी कधी भावाच्या घरी जीवन जगणाऱ्या कमलाबाई गुडघ्याच्या आजारासह अनेक व्याधीने त्रस्त आहेत. सरकारी मदत मिळाल्यानंतर त्यांना चांगले उपचार मिळाल्यास मदत होईल, असा विश्वास कमलाबाईचे भाऊ ओमकुमार चौकसे यांनी व्यक्त केला.

अशी मिळेल मदतदुसऱ्या महायुद्धात सहभागी झालेल्या सैनिकांच्या विधवांना सरकारचे आर्थिक साहाय्य मिळत असल्याचे कमलाबाई आणि त्यांच्या कुटुंबीयांना तीन वर्षांपूर्वी कळले. त्यानुसार कमलाबाईने मदतीसाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचे कार्यालय गाठले.राज्य सरकारने २९ डिसेंबर १९८९ पासून दुसऱ्या महायुद्धात सहभागी झालेल्या आणि डिसेंबर १९४९ पर्यंत पदमुक्त झालेल्या सैनिकांसाठी आणि त्यांच्या विधवांसाठी दरमहा मासिक निवृत्ती वेतनाची योजना लागू केली आहे. १ आॅक्टोबर १९८९ पासून ही योजना कार्यान्वित झाली असून, सुरुवातीच्या काळात निवृत्ती वेतनाची ही रक्कम दरमहा ३०० रुपये होती. सरकारने यात वेळोवेळी वाढ केली. त्यानुसार ही रक्कम आता प्रतिमहा तीन हजार रुपये इतकी मिळते.१ आॅक्टोबर १९८९ ते आतापर्यंतच्या कालावधीचा विचार करता जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नागपूर यांच्या कार्यालयानुसार कमलाबाई यांना सरकारकडून ४ लाख ३७ हजार ७५५ रुपये इतकी थकबाकी मिळणार आहे. यासोबतच तीन हजार रुपये नियमित निवृत्ती वेतनही मिळेल.

टॅग्स :Governmentसरकार