शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

मृत्यूने झपाटले पण ‘तो’ निसटला .....

By admin | Updated: February 1, 2015 01:01 IST

साक्षात मृत्यू बनून आलेला सळाकींचा एक भरधाव अनियंत्रित मिनी ट्रक सायकलस्वार शाळकरी मुलावर धडकणार तोच प्रसंगावधान राखून मुलाने सायकल सोडून रस्त्याच्या कडेला उडी घेतली

शाळकरी मुलाचे असेही प्रसंगावधाननागपूर : साक्षात मृत्यू बनून आलेला सळाकींचा एक भरधाव अनियंत्रित मिनी ट्रक सायकलस्वार शाळकरी मुलावर धडकणार तोच प्रसंगावधान राखून मुलाने सायकल सोडून रस्त्याच्या कडेला उडी घेतली आणि तो थोडक्यात बचावला. नक्कीच मुलगा चिरडल्या गेला असावा, अशी कल्पना करीत अंगाचा थरकाप झालेल्या रस्त्यावरील लोकांनी आरडाओरड करीत घटनास्थळी धाव घेतली. पण प्रत्यक्षात चुराडा सायकलचा झाला होता. ही घटना शनिवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास छापरूनगर चौकात घडली. उदय मिश्रा (१३), असे या नशीबवान मुलाचे नाव असून तो लकडगंज भागातील उमियाशंकर विद्यालयाचा विद्यार्थी आहे. हा थरार पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, उदय हा पुस्तक घेण्यासाठी लकडगंज झोन कार्यालयाकडून छापरूनगर चौकाकडे सायकलने जात होता. त्याच वेळी हरिहर मंदिराकडून सळाकींनी भरलेला एमएच-३१-५२०९ क्रमांकाचा मिनी ट्रक आला. तो भरधाव वेगात होता. तो छापरूनगर चौकाकडे सरसावताच रस्तादुभाजकाच्या नजीक या ट्रकच्या मागील चाकात सायकल फसली. क्षणात प्रसंगावधान राखून उदयने सायकल सोडून रस्त्याच्या कडेला उडी घेतली. तो बचावला, त्याच्या पायाला थोडे खरचटले. परंतु सायकलचा पूर्णत: चुराडा झाला होता. या घटनेनंतर ट्रकचालक आणि क्लिनर ट्रक सोडून पळून गेले. घटनास्थळी दाखल झालेल्या लकडगंज पोलिसांनी अन्य एका चालकाच्या मदतीने हा ट्रक पोलीस ठाण्याकडे नेण्याचा प्रयत्न केला. फसलेला ट्रक मागे घेतला जात असतानाच ब्रेक निकामी झाल्याने तो काही अंतर धावत राहिला. रस्त्यावरील लोक जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळत राहिले. अखेर हा ट्रक वाहतूक सिग्नलच्या खांबाला धडकला. त्यामुळे खांब रस्त्यावर कोसळले. काही क्षणापूर्वीच या ठिकाणाहून एक मोटरसायकलस्वार निघून गेला होता. (प्रतिनिधी)