शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचे अंत्यदर्शनही घेता आले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 21:04 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी गावापासून ८०० किलोमीटर चिचोली (खापरखेडा) येथे रोजगाराच्या शोधात आलेल्या राहुल कुमारच्या पत्नीचा झारखंड येथील गावी २० एप्रिल रोजी मृत्यू झाला. पत्नीचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गावी जाण्याची परवानगी मिळविण्यासाठी राहुल कुमारची धडपड व्यर्थ ठरली.

ठळक मुद्देआता दशक्रियेसाठी तो नातेवाईकांसोबत सायकलने निघाला झारखंडलामुलांसाठी पत्करली जोखीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (खापरखेडा) : पोटाची खळगी भरण्यासाठी गावापासून ८०० किलोमीटर चिचोली (खापरखेडा) येथे रोजगाराच्या शोधात आलेल्या राहुल कुमारच्या पत्नीचा झारखंड येथील गावी २० एप्रिल रोजी मृत्यू झाला. पत्नीचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गावी जाण्याची परवानगी मिळविण्यासाठी राहुल कुमारची धडपड व्यर्थ ठरली. शेवटी नातेवाईंकांनी अंत्यसंस्कार आटोपले. त्यामुळे किमान पत्नीच्या दशक्रियेसाठी गावी पोहोचायचेच असा संकल्प करीत गुरुवारी राहुल कुमार त्याच्या दोन नातेवाईकासोबत चक्क सायकलने झारखंड येथे रवाना झाला. सावनेर तालुक्यातील चिचोली (खापरखेडा) या गावात लॉकडाऊनमुळे झारखंड राज्यातील तीन मजूर अडकले आहेत. राहुल कुमार (२६), नितेश कुमार (२४) , रमेश कुमार (२४) अशी या तिघांची नावे आहेत. हे तिघेही डिसेंबर महिन्यापासून खापरखेडा येथे हिना इंजिनिअरिंग या कंपनीकडे कामाला आहे. सोमवारी (दि.२०) सकाळी राहुलकुमारची पत्नी शांतीदेवी हिचे अल्प आजाराने माहेरी गाव पालेकला जि. गढवा, झारखंड येथे निधन झाले. लॉकडाऊनमुळे मंगळवारी राहुलकुमारचे गावी पोहोचणे अशक्य असल्याने सोमवारी सायंकाळीच शांतीदेवीचे अंतिम संस्कार नातेवाईकांनी आटोपले. त्यातच राहुलकुमार आणि त्याच्या दोन नातेवाईकाने महाराष्ट्र पोलिसांना झारखंडला जाण्याची परवानगी मागितली होती. तो विनंती अर्जही बुधवारी सायंकाळी नाकारण्यात आला. परवानगी नाकारण्यात आल्यावर राहुलसह त्याचा भाऊ आणि साळा चिंतातूर झाले. याची माहिती राहुलने झारखंड येथे आईवडिलांना दिली. पत्नीचा तिसरा दिवस नाही तर निदान दशक्रियेसाठी तरी येणे गरजेचे असल्याने सर्वच विचारात पडले आणि त्याला येण्याची विनंती केली. सहा महिन्याच्या लहान मुलीची चिंता आणि घरी पोहोचून दशक्रियेचे सर्व धार्मिक विधी पार पाडून पत्नीला मोक्षप्राप्ती व्हावी यासाठी झारखंडला कसेही जायचे, असे राहुलकुमारने ठरविले. झारखंडला जायचे असल्याने तिघांनीही ठेकेदाराकडून पूर्ण कामाचा बाकी असलेला ३५ हजार रुपये पगार घेतला. त्या पैशातून त्यांनी गुरुवारी सकाळी खापरखेडा येथून तीन सायकली विकत घेतल्या आणि २० हजार रुपये पत्नीचा तिसरा दिवस व्हावा यासाठी बँकेत डिपॉझिट केले. काहीही झाले तरी झारखंडला पोहोचायचे हा उद्देश ठेवून ते सायकलने निघाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCyclingसायकलिंग