शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘एचसीबीए’चे ४०० वकील ‘डिफॉल्टर’;  निवडणुकीत मतदान करता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 10:50 IST

हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतचे सदस्यता शुल्क जमा केले नाही अशा सुमारे ४०० वकिलांना निवडणूक समितीने ‘डिफॉल्टर’ ठरवले आहे.

ठळक मुद्देसमितीचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतचे सदस्यता शुल्क जमा केले नाही अशा सुमारे ४०० वकिलांना निवडणूक समितीने ‘डिफॉल्टर’ ठरवले आहे. त्यामुळे संबंधित वकिलांना संघटनेच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. संघटनेतील १६ पदांसाठी ३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.१८ फेब्रुवारी २०१९ पूर्वीपासून संघटनेचे सदस्य असलेल्या वकिलांना थकीत सदस्यता शुल्क जमा करण्यासाठी सुरुवातीला २७ फेब्रुवारीच्या दुपारी ४.३० वाजतापर्यंत मुदत देण्यात आली होती. ती मुदत सोमवारी दुपारी १ वाजतापर्यंत वाढविण्यात आली होती. असे असताना सुमारे ४०० वकिलांनी थकीत सदस्यता शुल्क जमा केले नाही. त्यामुळे ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतचे सदस्यता शुल्क जमा केलेल्या १८०१ वकिलांची प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यावरील आक्षेपांवर सुनावणी घेऊन ६ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. संघटनेच्या कार्यकारिणीत अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, ग्रंथालय प्रभारी, कोषाध्यक्ष व नऊ कार्यकारी सदस्यांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी अ‍ॅड. प्रकाश मेघे, अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी, अ‍ॅड. अरुण पाटील, अ‍ॅड. संग्राम सिरपूरकर व अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

टॅग्स :Courtन्यायालय