शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हवाला स्कॅम; धक्कादायक घडामोड; भारतीय छापखान्यातील नोटा थेट हवाला रॅकेटमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2022 07:40 IST

Nagpur News छापखान्यात निर्मिती केलेल्या कोऱ्या करकरीत नोटा थेट हवाला रॅकेटमध्ये सापडल्यामुळे पोलीस यंत्रणाही हादरली आहे.

ठळक मुद्देबडे मासे गळाला लागणारपोलीस अचंबित, तपास यंत्रणांमध्ये खळबळ

नरेश डोंगरे

नागपूर : छापखान्यात निर्मिती केलेल्या कोऱ्या करकरीत नोटा थेट हवाला रॅकेटमध्ये सापडल्यामुळे पोलीस यंत्रणाही हादरली आहे. देशद्रोहाचा प्रकार ठरणाऱ्या या घडामोडीमुळे तपास यंत्रणांचेही लक्ष वेधले गेले असून, तपासात बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकूणच या हवाला रॅकेटमुळे संबंधित वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भारतीय चलनी नोटा छापण्याचा कारखाना नाशिक आणि देवासमध्ये आहे. येथे छापण्यात आलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या विभागीय कार्यालयांतून देशभरातील विविध लोकेशन्सवरील करन्सी चेस्ट आणि कॉईन डेपोमध्ये पाठविल्या जातात. तेथून या नोटा इतर बँकांमध्ये पाठविल्या जातात. यावेळी या नोटांच्या बंडलांचे विशिष्ट पद्धतीने पॅकिंग केलेले असते. हे पॅकिंग (आवरण) काढून संबंधित बँका त्यावर आपल्या बँकेचे कागदी आवरण आणि शिक्का मारून त्या ग्राहकांच्या हातात ठेवतात.

पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी नेहाल सुरेश वडालीयाच्या सदनिकेत छापा घातला. तेथे गोंदियातील हवाला व्यावसायिक शिवकुमार हरिश्चंद्र दिवानीवाल तसेच वर्धमान विलासभाई पच्चीकार हेसुद्धा होते. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन चार कोटी २० लाखांचे घबाड जप्त केले. विशेष म्हणजे, नोटांच्या या बंडलांत काही बंडल अशी आहेत की, त्या बंडलांवर थेट नोटा छपाईच्या कारखान्यासारखे दिसणारे पांढरे पॅकिंग लावलेले आहे. ते पाहून पोलीस अधिकारी अचंबित झाले आहेत. त्याचमुळे या नोटा छापखान्यातून थेट हवाला व्यावसायिकांकडे कशा पोहोचल्या, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

या नोटा वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडून गोळा केल्याचे प्राथमिक चौकशीत उपरोक्त हवाला व्यावसायिकांनी पोलिसांना सांगितले आहे. हे व्यापारी कोण आहेत, त्यांचा काय व्यवसाय आहे, त्याचा तपास आता पोलीस करत आहेत. विशिष्ट पॅकिंगच्या नोटांचे बंडल नेमके कुणी दिले, ते स्पष्ट झाले नसून पोलीस त्याचा तपास करत आहेत. पोलिसांनी या कारवाईची माहिती आयकर विभागासह अन्य तपास यंत्रणांनाही दिली आहे. त्यामुळे अन्य तपास यंत्रणाही आता हवाला रॅकेटच्या माध्यमातून उजेडात आलेल्या या धक्कादायक घडामोडीची चौकशी करत आहेत.

नोटा नकली की असली?

छापखान्यात नोटांच्या बंडलवर लावले जाणारे पॅकिंग आणि शुक्रवारी रात्रीच्या कारवाईत सापडलेल्या नोटांवरील पॅकिंग मिळतेजुळते दिसत असले तरी ते खरे की खोटे, हे स्पष्ट झालेले नाही. हवालाच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा वापर होतो. आतबट्ट्यांचा हा व्यवहार ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ या धोरणानुसार चालतो. त्यामुळे हवालातून आलेल्यांमध्ये नकली नोटा किती, त्याचा कुणी हिशेब ठेवत नाही. त्याचमुळे थेट छापखान्यातून हवालावाल्यांकडे आलेल्या या नोटा नकली आहेत की असली, असा प्रश्न आहे. नोटा असली असतील तर त्या थेट छापखान्यातून हवालावाल्यांकडे कशा पोहोचल्या, असाही प्रश्न उपस्थित होतो. पोलीस या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या कामी लागले आहेत.

----

टॅग्स :fraudधोकेबाजी