शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

हवाई सफरीने चिमुकले खूश

By admin | Updated: June 29, 2015 00:04 IST

विमान प्रत्यक्षात दिसते कसे, ते उडते कसे याचे बालमनाला कुतुहूल असते. त्यांची ही उत्कंठा शमवण्याचा अभिनव उपक्रम ‘लोकमत’ने राबविला.

३७ विद्यार्थी दिल्लीत : संरक्षणमंत्र्यांकडून ‘लोकमत’चे कौतुकनवी मुंबई : विमान प्रत्यक्षात दिसते कसे, ते उडते कसे याचे बालमनाला कुतुहूल असते. त्यांची ही उत्कंठा शमवण्याचा अभिनव उपक्रम ‘लोकमत’ने राबविला. याअंतर्गत ३७ लहानग्यांना चक्क हवाई सफर घडवून आणली. मुंबई ते दिल्ली या एक दिवसाच्या सफरीचा लहान मुलांनी मनसोक्त आनंद लुटला.‘लोकमत’च्या वतीने घेण्यात आलेल्या ‘संस्कारांचे मोती’ (२०१४) या स्पर्धेत हवाई सफरीसाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून एका विद्यार्थ्याची निवड करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्रातून ३५ तर गोवा येथून दोन अशा एकूण ३७ विद्यार्थ्यांना या सफरीचा आनंद लुटता आला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या छोट्या दोस्तांनी गुरुवारी पहाटे मुंबई विमानतळावरून विमानातून उड्डाण केले. त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. या मुलांनी पर्रीकर यांची भेट घेतल्यावर त्यांच्या मनातील संरक्षण दलाविषयीचे अनेक प्रश्न विचारले. त्याला पर्रीकर यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. थेट संरक्षणमंत्र्यांशी भेट झाल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला. दिल्ली भेटीत विद्यार्थ्यांनी कोटा भवन, रेल्वे म्युझियम, संसद भवन व इंडिया गेट या स्थळांना भेट दिली. कोटा भवन येथे विद्यार्थ्यांना एक शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली. त्यानंतर नौदलाकडून या मुलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. परतीच्या प्रवासादरम्यान दिल्ली विमानतळावर विद्यार्थ्यांच्या हातातील हे गिफ्ट पॅक आकर्षणाचा विषय ठरले होते.या हवाई सफरीमध्ये महाराष्ट्रातून ‘लोकमत’चे साहाय्यक उपाध्यक्ष (वितरण) वसंत आवारे यांच्यासह शरद सुरवसे (मुंबई), संतोष कळसकर (यवतमाळ), संजय गाडेकर (पुणे), विश्वजीत पाटील (कोल्हापूर), सागर लाडे (गोवा) आणि प्रताप शिरसाठ (औरंगाबाद) यांचा सहभाग होता. त्याशिवाय नॅशनल एडिटर हरीश गुप्ता, शीलेश शर्मा, प्रमोद गवळी, प्रवीण भागवत व छायाचित्रकार सुभाष शर्मा यांनीसुद्धा या उपक्रमात सहभाग घेतला. (प्रतिनिधी)पंतप्रधान मोदींनी दिल्या होत्या शुभेच्छा गतवर्षी जुलैमध्ये लोकमत ‘संस्कारांचे मोती’ या उपक्रमांतर्गत राज्यातील ३७ विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली होती. यात विदर्भातील ११ विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणात उच्च शिखर गाठण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मोदी यांनी लोकमतच्या ‘संस्कारांचे मोती’ या शिबिराचे कौतुकही केले होते. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी विद्यार्थ्यांचा दिलखुलास संवादराजधानी दिल्लीत या विद्यार्थ्यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. संरक्षणमंत्र्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याची आस्थेने चौकशी करीत त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. इतकेच नव्हे, तर आपण कसे आणि कोणत्या परिस्थितीत शिक्षण घेतले, याची माहितीही या विद्यार्थ्यांना दिली.विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर घालणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे ते या वेळी म्हणाले. तसेच विद्यार्थ्यांना संरक्षण खात्यातील विविध शस्त्रास्त्रांची ओळख करून देण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमासाठी १५ आॅगस्टच्या मुहूर्ताची निवड करावी, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली.