शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर दूरदर्शन कुणी पाहिले का? केबल, सेटटॉप बॉक्सच्या दुनियेत हरवली वाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 11:49 IST

Nagpur Doordarshan नागपूर दूरदर्शन अशा शिर्षकाखाली यावर स्थानिक कार्यक्रमांचे सादरीकरण व्हायचे. आता मात्र ते दिसेनासे झाले आहे.

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: २० वर्षांपूर्वी टीव्ही रसिकांसाठी प्रसारभारतीतर्फे संचालित होणारे दूरदर्शन हाच घरबसल्या मनोरंजनाचा एकमेव पर्याय होता. याच दूरदर्शनवर नागपूरसाठी स्वतंत्र असा एक तासाचा राखीव वेळ होता. नागपूर दूरदर्शन अशा शिर्षकाखाली यावर स्थानिक कार्यक्रमांचे सादरीकरण व्हायचे. आता मात्र ते दिसेनासे झाले आहे.दूरदर्शनवर शासकीय योजनांसोबतच, प्रत्येक भागातील कलाप्रकारांची माहिती, मनोरंजनात्मक कार्यक्रम सर्वत्र पोहोचवले जातात. मात्र, केबल, सेटटॉप बॉक्सच्या आगमनाने दूरदर्शन शहरी भागातून तरी हद्दपार झाल्याची स्थिती आहे.

त्याच पार्श्वभूमीवर नागपूर दूरदर्शन असा स्वतंत्र प्रकार होता, ही माहितीही आज कुणाला नाही. पूर्वी डीडी १ ही एकच वाहिनी सर्वत्र दिसत होती. महाराष्ट्रात स्वतंत्र अशी सह्याद्री वाहिनी नागरिकांना बघता येत होती. विदर्भात मात्र, डीडी १वरच संध्याकाळपासून मराठी कार्यक्रम बघता येत असे. त्यातही संध्याकाळी ६ ते ७ वाजताचा एक तासाचा वेळ नागपूर दूरदर्शनसाठी राखीव असायचा. या एक तासाचे सर्व संचलन सेमिनरी हिल्स येथील दूरदर्शन केंद्रावरून होत होते. यात कृषी दर्शन, डॉक्टरांशी संवादात्मक कार्यक्रम एखादी मालिका किंवा नाटकाचे सादरीकरण होत असे. सर्व स्थानिक कलावंत, वेगवेगळ्या क्षेत्रातील महनीय व्यक्तींचे कार्य याद्वारे पूर्व विदभार्तील नागरिकांपर्यंत पोहोचत होते. स्थानिक कलावंतांना टीव्हीवर येण्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ होते. आता मात्र ही वाहिनीच राहिली नसल्याचे स्पष्ट होत आहे.अँटिना काळ गेला!पूर्वी अँटिना शिवाय टीव्ही चालत नसे. घरोघरी छतावर अँटिना लागायचे आणि दूरदर्शनचा आस्वाद टीव्हीवर घेता येत होता. आता केबल, सेटटॉप बॉक्स आल्याने घरांवरून अँटिना हद्दपार झाला आहे. अँटिनाशिवाय नागपूर दूरदर्शनचे कार्यक्रम बघता येत नाही. त्याला पर्याय म्हणून आता नागपूर दूरदर्शनचे सगळे उपक्रम सह्याद्री वाहिनीवर प्रसारित केले जात आहेत.अनेक उपक्रम बंदनागपूर दूरदर्शनवरील जवळपास सगळेच कार्यक्रम बंद पडले आहेत. सह्याद्री वाहिनीसाठी म्हणून काही कार्यक्रम केले जातात. स्थानिक कलावंतांना त्यात काहीच स्थान नसते. शिवाय नागपूर दूरदर्शनचा लोगोही मिटविण्यात आलेला आहे.कोरोनामुळे शासकीय निर्देशानुसार कर्मचा?्यांना शिफ्टनुसार बोलविले जात आहे. मात्र, सह्याद्री वाहिनीवर नागपूर दूरदर्शनचे कार्यक्रम प्रसारित होत आहेत. लोगो नसला तरी नागपूर दूरदर्शन म्हणूनच कार्यक्रम दिसतात.भूपेंद्र तूरकर - उपसंचालक (अभियांत्रिकी), नागपूर दूरदर्शन

 

 

टॅग्स :Nagpur Doordarshan Kendraनागपूर दूरदर्शन केंद्र