शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सखींनी लुटला ‘फिटनेस टूर’चा आनंद

By admin | Updated: October 4, 2015 03:30 IST

नागपूरपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गसंपन्न वातावरणातील धानोली येथील रिसोर्टवर सखींनी एरोबिक्स, योगा, वेट मॅनेजमेंट, भोजन, ...

फिगर फ्रेमिंग हेल्थ इन्स्टिट्यूटमध्ये झुंबा, एरोबिक्स, मनोरंजनाची धमालनागपूर : नागपूरपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गसंपन्न वातावरणातील धानोली येथील रिसोर्टवर सखींनी एरोबिक्स, योगा, वेट मॅनेजमेंट, भोजन, स्विमिंग, एक्वा एरोबिक्स व अंताक्षरी खेळाचा आनंद लुटत धमाल केली. हा एक अविस्मरणीय दिवस ठरला. निमित्त होते लोकमत सखी मंच व फिगर फ्रेमिंग हेल्थ इन्स्टिट्यूटच्यावतीने आयोजित अभिनव सहल ‘फिटनेस टूर’चे. शुक्रवारी सकाळी सखी मंचची एक चमू वर्धा रोड मिहानजवळील वेणा नदीलगत असलेल्या या रिसोर्टवर पोहचली. येथे सकाळपासून ते सायंकाळपर्यंत विविध खेळांसोबतच सखींनी निरोगी आरोग्याच्या टिप्स जाणून घेतल्या. रिसोर्टवर सहल पोहचताच सर्व सखींनी नाश्ता केला. नंतर झुंबा डान्सला सुरुवात झाली. यात कधीही न नाचलेल्या सखींही सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर एकापेक्षा एक सरस व्यायामाच्या प्रकाराला सुरुवात झाली. एरोबिक्सचे विविध स्टेप्स सखींनी जाणून घेतले. स्विमिंगचा आनंदही लुटला. एवढेच नव्ह ेतर ‘एक्वा एरोबिक्स’ही केले. त्यानंतर सर्वांनी एकत्र बसून भोजनाचा आनंद घेतला. थोडावेळ विश्रांती घेऊन पुन्हा विविध खेळ, अंताक्षरी आणि मनोरंजक हौजी खेळात सखी हरखून गेल्या. ‘वन मिनीट गेम शो’मधून सखींना विविध पुरस्कार जिंकण्याची संधी मिळाली. याच दरम्यान ‘फिगर फ्रेमिंग’च्या संचालिका सुरेखा माहोरकर यांनी सखींच्या आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, प्रत्येक सखींनी स्वत:वर प्रेम करायला हवे. यामुळे स्वत:कडे विशेष लक्ष देता येईल, चांगले आरोग्य लाभेल. फिगर फ्रेमिंग हेल्थ इन्स्टिट्यूट आरोग्य सेवा आणि प्रशिक्षणाच्या क्षेत्रात मध्य भारतातील अग्रणी संस्था आहे. गेल्या २९ वर्षांपासून कार्यरत आहे. ही संस्था नागपूरमध्ये नरुला बिल्डिंग, ८, फार्मलॅण्ड, लोकमत चौक वर्धा रोड येथे आहे. येथे आरोग्याशी संबंधी योगा, जिम, एरोबिक्स, झुंबा, कॉर्डिओ युनिट, वजन कमी करणे, वाढविणे आदींची सोय उपलब्ध असल्याचीही माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)