शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

हापूसची तहान बैंगनफल्लीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 11:39 IST

अक्षयतृतीयेपासून आंब्याच्या विक्रीत वाढ होते. सध्या कळमना फळे बाजारात सर्व प्रकारच्या आंब्यांची आवक वाढली असून दर सर्वसामान्यांच्या आटोक्यात आहेत.

ठळक मुद्देकळमन्यात आंब्याची आवक वाढली हापूस महागच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अक्षयतृतीयेपासून आंब्याच्या विक्रीत वाढ होते. सध्या कळमना फळे बाजारात सर्व प्रकारच्या आंब्यांची आवक वाढली असून दर सर्वसामान्यांच्या आटोक्यात आहेत. त्यातच आंध्र प्रदेशातील बैगनफल्ली आंब्याला सर्वाधिक मागणी आणि पसंती आहे. पूर्वीच्या तुलनेत किरकोळमध्ये प्रति किलो भाव ५० ते ६० रुपयांवर आहेत. भाव कमी असल्यामुळे नागपूरकर आंब्याचा गोडवा चाखत आहेत. आता ऊन चांगले तापू लागल्याने भाव कमी होण्याची शक्यता आहे. सध्या घरोघरी आमरसाचा पाहुणचार सुरू आहे.भाव आणखी कमी होणाररसाचा आंबा म्हणून बैगनफल्लीचा नागपुरात सर्वाधिक खप आहे. किरकोळ बाजारात बहुतांश हातगाड्यांवर विक्री सुरू आहे. अवकाळी पाऊस न आल्यास पुढे आवक वाढून दर आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत. २० दिवसांपूर्वी घाऊक बाजारात ६० ते ८० आणि किरकोळ बाजारात १०० ते १२० रुपये किलो असलेला बैगनपल्ली आंबा आता घाऊक बाजारात ४० च्या खाली गेला आहे. पुढील काही दिवसांत किरकोळमध्ये ५० च्या आत विक्री होईल, असे विक्रेत्यांनी सांगितले.दशहरी व लंगडा आंब्याला मागणीकळमन्यात आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि दिल्ली येथून दररोज १५० ते २०० ट्रक आंब्याची आवक होत आहे. यामध्ये बैगनफल्ली, तोतापुरी, दशहरी, लंगडा, केसर, हापूस आंब्यांचा समावेश आहे. याशिवाय नागपूरलगत भिवापूर, मांढळ, गोंदिया, वरुड येथून गावराणी आंब्यामध्ये मुख्यत्वे लंगडा, दशहरी, चौसा मोठ्या प्रमाणात येत आहे. कळमन्यात हापूस ४०० ते ६०० रुपये किलो, दशहरी ४० ते ५०, लंगडा ३० ते ४०, केसर १०० ते १५०, तोतापुरी ३५ ते ७०, बैगनफल्ली ३० ते ४० आणि गावराण २० ते ४० रुपये भाव आहेत. पण किरकोळमध्ये भाव कळमन्याच्या तुलनेत दीडपट आणि दुप्पट आहेत. रत्नागिरीच्या हापूस आंब्याचे भाव जास्त असून मागणी कमी आहे. त्यामुळे आडतिये विक्रीसाठी फार कमी प्रमाणात बोलवीत आहेत. डझन पेट्यांमध्ये आवक सुरू आहे.आवक वाढली, दर कमीयावर्षी सर्व प्रकारच्या आंब्याची आवक वाढली असून नागपुरात सर्वाधिक विक्री होणाऱ्या बैगनफल्लीची आवक आंध्र प्रदेशातून होत आहे. कळमन्यात भाव कमी असले तरीही किरकोळमध्ये भाव जास्त आहेत. पुढे भाव कमी होण्याची शक्यता आहे.-आनंद डोंगरे, माजी अध्यक्ष,कळमना फळ बाजार असोसिएशन

टॅग्स :Mangoआंबा