शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
5
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
6
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
7
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
8
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
9
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
10
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
11
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
12
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
13
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
14
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
15
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
16
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
17
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
18
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
19
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
20
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र

‘हॅन्डलूम एक्स्पो’ला भरघोस प्रतिसाद हॅन्डमेड वस्तू ठरताहेत फॅशनचा पर्याय

By admin | Updated: September 19, 2015 03:58 IST

जुन ते सोनं म्हणतात ते यालाच. हाताने बनविलेल्या वस्तूंना आतापर्यंत जुने म्हणून नाकारले जात होते,

नागपूर : जुन ते सोनं म्हणतात ते यालाच. हाताने बनविलेल्या वस्तूंना आतापर्यंत जुने म्हणून नाकारले जात होते, मात्र त्याच वस्तू आज फॅशनचा पर्याय ठरत आहे. मग ते कपडे असो की घरातील इन्टेरीयरच्या वस्तू. म्हणूनच की काय नार्थ अंबाझरी रोडवरील इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरींगच्या हॉलमध्ये लागलेल्या हॅन्डलूम एक्स्पोला पहिल्याच दिवशीपासून नागपूरकरांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.अक्शा हॅन्डलूम हॅन्डीक्रॉफ्ट पर्यावरण विकास समितीतर्फे हे प्रदर्शन आणि विक्री केंद्र लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने ११ राज्यातील ४० विणकर आणि १० हस्तशिल्पींचे ५० स्टॉल येथे लावण्यात आले आहेत. प्रदर्शनामध्ये विणकरांनी आपल्या कौशल्याने स्वत: बनविलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. यामध्ये मध्य प्रदेशची चंदेरी व माहेश्वरी साडी, भागलपुरी सुट, टॉप, साड्या, आंध्र प्रदेशची कालमकरी, मंगलगिरी साडी, उत्तर प्रदेशचे लखनवी चिकन, राजस्थानी बेडशीट, काश्मीरची पश्मिना शॉल, पश्चिम बंगालची काथावर्कची साडी, सूट, टॉप, छत्तीसगडची कोसा सिल्क साडी व महाराष्ट्राची नऊवारी व सहावारी साड्या महिलांमध्ये आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.पुरुषांसाठीही कॉटनच्या आकर्षक कुर्ती, नवीन फॅशनचे शर्ट व लहान मुलांचे कपडेही लोकांच्या पसंतीस पडतील असे आहेत. कपड्यांसोबतच कलाकुसरीच्या वस्तूही लोकांचे विशेष लक्ष वेधत आहेत.आसामच्या कारागिरांनी तयार केलेले हुबेहूब खऱ्या फुलांसारखे वाटणारे ड्रायफलावर, कॉईन मेड ज्वेलरी, सारंगपूरची लाकडी खेळणी, इमिटेशन ज्वेलरी व नक्षीकाम केलेल्या वस्तूंचा समावेश आहे. गरीब विणकरांनी स्वत: बनविलेली वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठीहे प्रदर्शन लावल्याचे संस्थेचे संचालक प्रवीण चापरे यांनी पत्रपरिषदेत सांगितले. प्रदर्शन ५ आॅक्टोंबरपर्यंत चालणार आहे. या पत्रकार परिषदेला छत्तीसगडचे नथ्थूराम देवांगण, जयपूरचे रामेश्वर यादव आदी उपस्थित होते. (वा. प्र.)