शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

शुभांगीच्या मदतीसाठी सरसावले हात

By admin | Updated: August 11, 2016 02:08 IST

दुर्धर आजाराने ग्रासलेल्या शुभांगी शेषराव देशभ्रतार या युवतीच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांचे हात पुढे आले आहे.

नागपूर : दुर्धर आजाराने ग्रासलेल्या शुभांगी शेषराव देशभ्रतार या युवतीच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांचे हात पुढे आले आहे. तिच्या उपचारासाठी १९ इंजेक्शन लागणार होते. प्रती इंजेक्शनचा खर्च १८००० रुपये होता. या संपूर्ण इंजेक्शनची सोय झाली आहे. मेडिकल रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे, हळूहळू तिच्या प्रकृतीतही सुधारणा होत आहे. शुभांगीसाठी लोकमतने समाजाला मदतीचे आवाहन केले होते. शुभांगीला ‘थायमोमा’ व ‘मॅस्थेनिया ग्रॅव्हीस’नावाचा दुर्धर आजार जडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ‘मॅस्थेनिया ग्रॅव्हीस’ हा विदेशी आजार असून, त्यावर अमेरिकेत उपचार होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. तिच्या उपचारासाठी अमेरिके तून औषधे मागवावी लागणार होती. १९ इंजेक्शन डॉक्टरांनी सांगितले होते. एक इंजेक्शन १८ हजार रुपयांचे होते. डॉक्टरांनी तिच्या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगितले होते. हलाखीच्या परिस्थितीमुळे उपचार घेणे तिला अवघड जात होते. तिच्या उपचारासाठी आर्थिक बळ जमविण्यासाठी घरच्यांचा आटापिटा सुरू होता. परंतु आर्थिक मदतीचा कुठूनही हात पुढे येत नसल्याने तेही हतबल झाले होते. लोकमतने तिच्या मदतीसाठी समाजाला आवाहन केले होते. लोकमतच्या आवाहनाला साद देत सॉफ्टवेअर इंजिनीअर अभिजित फाळके यांनी तिच्या नातेवाईकाशी संपर्क साधून राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या माध्यमातून ११ इंजेक्शन उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे यापूर्वी दोन वेळा राजीव गांधी योजनेतून तिची केस रद्द झाली होती. अभिजित फाळके यांच्या प्रयत्नामुळे योजनेचा तिला लाभ मिळाला. त्याचबरोबर एका अग्रवाल नावाच्या इसमाने तिच्या ८ इंजेक्शनची सोय करून दिली. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहे. ती बरी झाल्यानंतर ‘थायमोमा’ चे आॅपरेशन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)