शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

तलावांच्या सफाईसाठी सरसावले हात

By admin | Updated: September 18, 2016 02:47 IST

गणेश विसर्जनानंतर सोनेगाव तलाव साफ करण्यासाठी भाजप दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातील आमदार

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : अनिल सोले, ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनचा पुढाकारनागपूर : गणेश विसर्जनानंतर सोनेगाव तलाव साफ करण्यासाठी भाजप दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातील आमदार प्रा. अनिल सोले आणि ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनने तलाव परिसरातील नागरिकांना स्वच्छता अभियानात सहभागाचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जवळपास ७०० नागरिक सरसावले अन् अवघ्या दोन तासात त्यांनी सामूहिक प्रयत्न करून अवघा सोनेगाव तलाव आणि परिसर स्वच्छ केला.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मदिनानिमित्त सेवा दिवसाचे औचित्य साधून शनिवारी सकाळी सोनेगाव तलावाची स्वच्छता करण्यात आली. भारतीय जनता पार्टी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातील आमदार प्रा. अनिल सोले आणि ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनच्या आवाहनाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी ९ वाजता सोनेगाव तलाव परिसरात शेकडो महिला आणि पुरुष गोळा झाले. प्रत्येकाने आपल्या सोबत मोठमोठे घमेले, फावडे, टोपल्या आणल्या होत्या. तलावाकाठावरील कचरा, प्लास्टिक फावड्याच्या साहाय्याने तर तलावाच्या आतील कचरा बांबूला टोपल्या बांधून तलावाच्या काठावर आणण्यात आला. हा कचरा पोत्यात भरण्यात आला. हे पोते डम्पिंग यार्डमध्ये नेण्यात आले. सकाळी ११ वाजेपर्यंत सोनेगाव तलाव परिसर स्वच्छ झाला. तलावाच्या मध्यभागातील कचरा बोटीद्वारे काढण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी आणि ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशन या संघटनेचे आमदार प्रा. अनिल सोले, नगरसेवक प्रकाश तोतवानी, गिरीश देशमुख, नगरसेविका पल्लवी शामकुळे, नीलिमा बावणे, उषा निशितकर, भाजप दक्षिण-पश्चिम नागपूरचे अध्यक्ष प्रकाश भोयर, किशोर वानखेडे, श्रीकांत भुरे, विवेक गर्गे, राम मुंजे, दिलीप दिवे, नंदा जिचकार, अनसूया गुप्ता, स्नेहल गोतमारे, आशिष पाठक, छोटू बोरीकर आदी कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती. नागरिकांनी प्रतिसाद दिल्यामुळे सोनेगाव तलाव स्वच्छ होऊ शकला, त्यामुळे हे जनतेचे यश आहे, असे मत आमदार प्रा. अनिल सोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. (प्रतिनिधी)१५ हजार गणेश मूर्तींचे कृत्रिम टँकमध्ये विसर्जनसोनेगाव परिसरात विसर्जनासाठी कृत्रिम टँक ठेवण्यात आले होते. प्रा. अनिल सोले आणि ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनने परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करून कृत्रिम टँकमध्ये विसर्जनाचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनानुसार परिसरातील १५ हजार गणेश मूर्तींचे कृत्रिम टँकमध्ये विसर्जन करण्यात आले. शनिवारी राबविण्यात आलेल्या सफाई अभियानातही जवळपास ३ ट्रक कचरा तलावाबाहेर काढण्यात आला. तर २५० टन निर्माल्य खतासाठी अंबाझरी येथे पाठविण्यात आले.