शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

अगरबत्ती तयार करणारे हात होणार बेकार

By admin | Updated: October 27, 2014 00:30 IST

बदलत्या युगात उद्योग क्षेत्राच्या भरभराटीला नवनवीन यंत्र सामग्रीची जोड मिळाली असली तरी छोट्या आणि विशेषत: पारंपरिक कुटीर उद्योगांमधील रोजगार मात्र यामुळे हिरावला जात आहे.

हजारो कारागिरांवर बेरोजगारीचे संकट : एकट्या उत्तर नागपुरातच चार हजार कारागीरनागपूर : बदलत्या युगात उद्योग क्षेत्राच्या भरभराटीला नवनवीन यंत्र सामग्रीची जोड मिळाली असली तरी छोट्या आणि विशेषत: पारंपरिक कुटीर उद्योगांमधील रोजगार मात्र यामुळे हिरावला जात आहे. नागपूर आणि परिसरातील हजारो महिलांचे हात यंत्रामुळे बेकार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागपूर, कामठी, गोंदिया, भंडारा या परिसरात पारंपरिक पद्धतीने अगरबत्ती तयार करणारे हजारो कारागीर आहेत. या पारंपरिक उद्योगाने विशेषत: झोपडपट्ट्यांमधील महिलांना मोठा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. एकट्या उत्तर नागपुरातच सुमारे चार हजार कारागिरांचे कुटुंब या उद्योगावर अवलंबून आहेत. उत्तर नागपुरातील झोपडपट्ट्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने अगरबत्ती करण्याचे छोटे-छोटे घरगुती कारखाने आहेत. १० महिलांपासून ते ४०० महिलांपर्यंतच्या लोकांना एकेका कारखान्याने रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. या कारागिरांनी तयार केलेला माल मोठे व्यापारी विकत घेतात आणि आकर्षक पॅकेजिंग करून ते विकतात, असा हा व्यापार चालतो. अगरबत्ती तयार करणे ही एक कला आहे. कोळसा, मैदा, नुरवा यांच्या मिश्रणातून पावडर तयार केली जाते. यात विविध प्रकारचे सेंट टाकून अगरबत्ती बनवली जाते. अगरबत्ती बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काड्याही विविध प्रकारच्या असतात. आसाम आणि बालाघाट येथील विशिष्ट बांबुपासून या काड्या तयार केल्या जातात. सध्या बालाघाटी काडीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. एका महिलेला हजार अगरबत्तीमागे पूर्वी १५ ते १८ रुपये रोजी मिळत असे. प्रत्येक जण दिवसभरात किमान १०० रुपये रोजी मिळवतात. अनेक जणांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य अगरबत्ती तयार करतात. अनेकांनी तर सुट्यांमध्ये आणि फावल्या वेळात अगरबत्ती तयार करून आपले शिक्षण पूर्ण केले आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून नागपूर आणि परिसरातील हा व्यवसाय संकटात सापडला आहे. मोठ्या व्यापाऱ्यांनी आता अगरबत्ती तयार करण्यासाठी यंत्र वापरणे सुरू केले आहे. त्यामुळे येथील पारंपरिक कारागीर बेरोजगार झाले आहे. उत्तर नागपुरातील एकेक कारखाना बंद पडू लागला आहे. कारागिरांची रोजगारासाठी वणवण सुरू आहे. (प्रतिनिधी)