शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

अशोक धवड यांच्यासह पाच आरोपींना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 19:44 IST

नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा याकरिता अध्यक्ष अशोक शंकर धवड (६५) यांच्यासह किरण अशोक धवड (५९), नाना केशव देवलकर (७८), डॉ. प्रभाकर गोपाल धानोरकर (६८) व कृष्णा महादेव निरुळकर (६७) यांनी दाखल केलेला अर्ज एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला. न्यायाधीश सुनील पाटील यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देविशेष सत्र न्यायालय : अटकपूर्व जामीन अर्ज खारीज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा याकरिता अध्यक्ष अशोक शंकर धवड (६५) यांच्यासह किरण अशोक धवड (५९), नाना केशव देवलकर (७८), डॉ. प्रभाकर गोपाल धानोरकर (६८) व कृष्णा महादेव निरुळकर (६७) यांनी दाखल केलेला अर्ज एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला. न्यायाधीश सुनील पाटील यांनी हा निर्णय दिला. अन्य आरोपी विजय बाभरे, राजेंद्र पिंपळकर व विकेश जोशी यांच्या अर्जावर शुक्रवारी निर्णय दिला जाणार आहे.बँकेत ३८ कोटी ७५ लाख २० हजार ६४१ रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणात धंतोली पोलिसांनी १५ मे २०१९ रोजी श्रीकांत सुपे (५७) यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२०-ब, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७-अ यासह एमपीआयडी कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. २०१४-१५ मध्ये बँकेतून ४ कोटी ३ लाख रुपयांची उचल करण्यात आली व बनावट कागदपत्राच्या आधारे ती रक्कम बँकेला परत केल्याचे दाखवण्यात आले. अशा विविध प्रकारे बँकेत घोटाळा करण्यात आला. न्यायालयात आरोपींतर्फे अ‍ॅड. बी. एम. करडे, अ‍ॅड. किशोर आंबिलवादे, अ‍ॅड. नीलेश फुलझेले व अ‍ॅड. नीरज करडे तर, सरकारतर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Ashok Dhawadअशोक धवडbankबँकfraudधोकेबाजीCourtन्यायालय