लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या आसीनगर झोन क्षेत्रातील कामठी रोडवरील इंदोरा येथील शैलेंद्र शाहू व इतर नऊ वहीवाटदार मे. विदर्भ डिस्ट्रीलर्स व पार्टनर आसवी निदशॉ बापूना व अन्य ११ नी केलेले गोडावूनचे अनधिकृत बांधकाम महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबी व टिप्परच्या साहाय्याने गुरुवारी पाडले.मे. विदर्भ डिस्ट्रीलर्स व पार्टनर यांनी मौजा इंदोरा, खसरा क्रमा.त १०४/३, १०६/३ येथे २५०चौरस मीटर जागेवर नकाशा मंजूर न करता गोडाऊ नचे बांधकाम केले होते. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनयमाचे कलम ५३(१) अन्वये संंबंधिताना अनधिकृत बांधकाम पाडण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. मात्र संबंधितानी नगररचना विभागाकडे सुधारित नकाशा मंजुरीसाठी सादर केला होता. हा नकाशा विभागाने नामंजूर केल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार गोडावून पाडण्याची कारवाई करण्यात आली.सहायक आयुक्त गणेश राठोड यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अभियंता अजय पाझारे यांच्या नेतृत्वात कनिष्ठ अभियंता संजय सोनवणे यांच्यासह पथकाने केली. कारवाईचा खर्च म्हणून ५० हजार संबंधिताकडून वसूल करण्यात आले.
विदर्भ डिस्ट्रीलर्सच्या अनधिकृत गोदामावर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 21:56 IST
महापालिकेच्या आसीनगर झोन क्षेत्रातील कामठी रोडवरील इंदोरा येथील शैलेंद्र शाहू व इतर नऊ वहीवाटदार मे. विदर्भ डिस्ट्रीलर्स व पार्टनर आसवी निदशॉ बापूना व अन्य ११ नी केलेले गोडावूनचे अनधिकृत बांधकाम महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबी व टिप्परच्या साहाय्याने गुरुवारी पाडले.
विदर्भ डिस्ट्रीलर्सच्या अनधिकृत गोदामावर हातोडा
ठळक मुद्देआसीनगर झोनची कारवाई : नकाशा मंजूर न करता बांधकाम