शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दागिन्यांसाठी हॉलमार्किंग १६ जूनपासून अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:07 IST

नागपूर : केंद्र सरकारने दागिन्यांसाठी संपूर्ण देशात हॉलमार्किंग १६ जूनपासून अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी ...

नागपूर : केंद्र सरकारने दागिन्यांसाठी संपूर्ण देशात हॉलमार्किंग १६ जूनपासून अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी घेतला आहे. त्यामुळे सराफांची लहान-मोठी दुकाने बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आता ग्राहकांना केवळ १४, १८ आणि २२ कॅरेटचे दागिने मिळणार आहे. विदर्भात सर्वाधिक विक्रीची २४ कॅरेट दागिने मिळणार नाहीत.

बीआयची लॅब नसलेल्या जिल्ह्यात हॉलमार्किंग अनिवार्य करू नये

पूर्वी १ मेपासून हॉलमार्किंग अनिवार्य केले होते; पण जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी असोसिएशनचे पुणे आणि नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई आणि नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना कोर्टाने १५ जूनपर्यंत भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस) सराफांवर कारवाई न करण्याचे आदेश दिले होते. लॉकडाऊनमुळे सराफांची दुकाने बंद असल्याने हॉलमार्किंग अनिवार्य करण्याची प्रक्रिया पुढे ढकलल्याची मागणी असोसिएशनने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे आणि पीयूष गोयल यांच्याकडे केली होती. त्यानुसार देशातील दहा मोठ्या असोसिएशनच्या २० पदाधिकाऱ्यांशी झूम बैठक घेऊन अडीच तास चर्चा केली. या बैठकीत नागपुरातील असोसिएशनचे राजेश रोकडे यांनी भाग घेतला. बैठकीत गोयल यांनी १६ जूनपासून हॉलमार्किंग अनिवार्य करण्याचे सूतोवाच केले आणि तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची समिती बनविली. ही समिती चार दिवसांत अहवाल देणार आहे. ज्या राज्यात आणि जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग सेंटर नाहीत, त्या ठिकाणी हॉलमार्किंग अनिवार्य करू नये, अशी मागणी करण्यात आली.

सराफांना दंड व शिक्षेची तरतूद चुकीची

राजेश रोकडे म्हणाले, सराफा व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता केंद्र सरकारने हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. देशातील अनेक राज्यात आणि जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग सेंटर नाहीत. शिवाय हॉलमार्किंग केल्याशिवाय सराफांना दागिने विकता येणार नाहीत. विक्री केल्यास सराफांना दंड आणि शिक्षेची तरतूद कायद्यात केली आहे. जिथे बीआयएसची लॅब आहे, त्या ठिकाणीच हॉलमार्किंग बंधनकारक करावे. विदर्भात तीन लॅब असून, एक अकोला आणि दोन नागपुरात आहेत. विदर्भातील १० हजारांपेक्षा जास्त सराफा दागिन्यांचे हॉलमार्किंग कसे करतील, हा गंभीर प्रश्न आहे. नागपूर जिल्ह्यात तीन हजारांपेक्षा जास्त सराफा व्यापारी आहे. एवढ्या संख्येनुसार नागपुरात दहा लॅब आणि प्रत्येक जिल्ह्यात एक वा दोन लॅब असायला हव्यात. सरकार सराफांना विश्वासात न घेता हॉलमार्किंग लागू करीत आहेत. यामुळे इन्स्पेक्टर राज वाढणार आहे.