शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

हिमोफिलियाचे रुग्ण धोक्यात

By admin | Updated: February 21, 2017 02:27 IST

हिमोफिलिया हा रक्त गोठण्यासंबंधीचा दुर्मिळ आजार आहे. या रुग्णांमध्ये रक्त गोठविणाऱ्या प्रथिनांचे प्रमाण पुरेसे नसते...

राज्यभरात औषधांचा तुटवडा : १२ महिन्याचा साठा संपला चारच महिन्यातसुमेध वाघमारे नागपूर हिमोफिलिया हा रक्त गोठण्यासंबंधीचा दुर्मिळ आजार आहे. या रुग्णांमध्ये रक्त गोठविणाऱ्या प्रथिनांचे प्रमाण पुरेसे नसते किंवा पूर्णपणे नसते. रुग्णाला ‘अँटी हिमोफिलिक फॅक्टर’ औषध दिले जाते. हे औषध वेळेत न मिळाल्यास मृत्यूचा धोका असतो. हे औषध सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने शासनाने काही ठिकाणी नि:शुल्क उपलब्ध करून दिले आहे. परंतु या केंद्रांवर १२ महिन्यांचा साठा चारच महिन्यात संपल्याने या जीवरक्षक औषधांचा तुटवडा पडला असून रुग्ण धोक्यात आले आहेत.प्रत्येक १० हजार लोकसंख्येत एक हिमोफिलियाचा रुग्ण आढळून येतो. या आजारातील रुग्णाच्या रक्तामध्ये ‘थ्राम्बोप्लास्टीन’ हा रक्तातील घटक निर्माण होत नाही. यामुळे रुग्णाला जर जखम झाली तर रक्तस्राव थांबत नाही. रु ग्णांमध्ये शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाला तर परिस्थिती अधिक गंभीर होते. यामुळे या आजाराचे वेळीच निदान होऊन औषधोपचार होणे आवश्यक ठरते. परंतु हिमोफिलिया रुग्णांचे फॅक्टर परदेशातून आयात होतात. यामुळे ते महागडे असते. २०१५ मध्ये हिमोफिलियाच्या रुग्णांनी न्यायालयीन लढाई जिंकून राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून हे जीवनावश्यक औषधे मिळवून घेतली आहेत. हे औषध मुंबई येथील केईएम रुग्णालय, पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न ससून रुग्णालय, सातारा, नाशिक, ठाणे, अमरावती येथील जिल्हा रुग्णालयांमधून देण्याची सुविधा आहे. दुसऱ्या टप्प्यात नागपुरातील मेयो रुग्णालयासह औरंगाबाद व इतरही ठिकाणी ही सुविधा सुरू होणार होती. परंतु महागडे औषध घेण्यासाठी राज्याला केंद्राची मदत घ्यावी लागत असल्याने तूर्तास तरी दुसऱ्या टप्पा सुरू करण्यात आला नसल्याचे समजते. विशेष म्हणजे, नुकतेच सर्व औषध वितरण केंद्रावर हिमोफिलियाचे औषध उपलब्ध करून देण्यात आले होते. साधारणत: १२ महिन्याचा साठा होता. परंतु नि:शुल्क औषधे मिळत असल्याने राज्याबाहेरील रुग्णांची गर्दी वाढली. यामुळे १२ महिन्यांचा साठा असलेले औषध चारच महिन्यात संपले.नागपूर जिल्ह्यात १० हजारावर रुग्णहिमोफिलिया सोसायटीकडे नागपूर शहरातील ३५० रुग्णांची तर जिल्ह्यात ४२५ रुग्णांची नोंद आहे. परंतु जिल्ह्यात निदान न झालेले १० हजारावर रुग्ण असण्याची शक्यता आहे. या व्याधीवरील औषध अत्यंत महाग असते. एका रुग्णाचा वार्षिक खर्च सुमारे एक लाख जातो. व्याधीग्रस्ताला किती युनिट औषध द्यायचे ते संबंधित व्याधिग्रस्तांच्या वजनावर आणि होणाऱ्या रक्तस्रावावर अवलंबून असते. नागपुरात या आजाराचे औषध नि:शुल्क मिळत नाही. रुग्णांना अमरावतीला जावे लागते. मात्र, बहुसंख्य रुग्णांना जाणे-येणे शक्य होत नसल्याने व आता औषधांचा तुटवडा पडल्याने रुग्ण औषधांपासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती आहे. औषधांची खरेदी लवकरचराज्यात हिमोफिलिया औषधांचा बारा महिन्यांचा साठा चारच महिन्यात संपला आहे. ‘अँटी हिमोफिलिक फॅक्टर’ हे महागडे असते. यामुळे याच्या खरेदीसाठी केंद्राकडून मदत घेण्यात आली आहे. या औषधाच्या खरेदीसाठी नुकतेच १६ कोटी रुपयांची जमवाजमव करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच औषधे खरेदी केली जाणार आहे.-डॉ. सतीश पवारसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग