शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘ईडी’ च्या रडारवर ग्वालबन्शी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:59 IST

अंमलबजावणी संचालनालया (ईडी) कडून भूमाफिया दिलीप ग्वालबन्शीविरुद्ध मनी लाँड्रिंगची कायद्यान्वये कारवाई विचाराधीन आहे.

ठळक मुद्देदिलीप ग्वालबन्शीविरुद्ध होणार मनी लाँड्रिंगची कारवाईविशेष पथकाने दाखल केली ३४ प्रकरणे, ४४ आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंमलबजावणी संचालनालया (ईडी) कडून भूमाफिया दिलीप ग्वालबन्शीविरुद्ध मनी लाँड्रिंगची कायद्यान्वये कारवाई विचाराधीन आहे. ग्वालबन्शी आणि त्याच्या पत्नीच्या नावे असलेली नागपूर जिल्ह्यातील ९८.३३ एकर जमीन महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) जप्त करण्यात आलेली आहे.दिलीप ग्वालबन्शी आणि त्याच्या टोळीविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आलेली आहे. एसआयटीने दिलीप आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध १३ प्रकरणे दाखल केलेली आहेत. दिलीप, त्याचे साथीदार ईश्वर सुप्रेटकर, अंथोनी ऊर्फ जॉन स्वामी, प्रेम यादव, पप्पू ऊर्फ राहुल यादव यांच्याविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून प्रेमव्यतिरिक्त सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.मोक्काच्या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांनी दिलीप ग्वालबन्शी आणि त्याची पत्नी शुभांगी यांनी गुन्हेगारीच्या माध्यमातून जमवलेल्या संपत्तीची माहिती प्राप्त केली. त्या आधारावर दिलीपच्या नावे ६५.३३ आणि शुभांगीच्या नावे ३३.०३ एकर जमीन असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या मालमत्ता पिपळा रिठी, तारसा, मौदा, गोरेवाडा, कामठीच्या खैरी, हजारी पहाड, कळमेश्वर, येरला आणि गिट्टीखदानच्या बोरगाव भागातील आहेत.पोलिसांनी या संपत्ती जप्त करण्यासाठी मोक्का विशेष न्यायालयात निवेदन सादर केले होते. त्यानुसार न्यायालयाने जप्तीची अनुमती दिली. मोक्काअंतर्गत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलीप ग्वालबन्शी व पत्नीच्या संपत्तीबाबतची सूचना प्रवर्तन निदेशालय आणि आयकर विभागाला दिल्याचे सांगितले.ही संपत्ती अवैध मार्गाने प्राप्त करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ईडी ग्वालबन्शीविरुद्ध मनी लाँडरिंग अ‍ॅक्टअंतर्गत कारवाई करणार आहे. दिलीप ग्वालबन्शीच्या पत्नीविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याने तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे हे करीत आहेत.९९९ तक्रारींची सुरू आहे चौकशीपत्रकारांशी बोलताना कदम यांनी सांगितले की, एसआयटीने आतापर्यंत ३४ प्रकरणे दाखल केलेली आहेत. त्यात १५० जणांना आरोपी करण्यात आले आहे. आतापर्यंत ४४ जणांना अटक करण्यात आलेली आहे. ६५८ पीडितांना त्यांच्या जमिनींचा ताबा देण्यात आलेला आहे. ५२२ तक्रारींचा निपटारा करण्यात आलेला असून ९९९ तक्रारींची चौकशी सुरू आहे. मात्र एसआयटीचे कामकाज गुंडाळले जाण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.