शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

ग्वालबन्सीसोबतच अन्य भूमाफिया पोलिसांच्या रडारवर

By admin | Updated: May 16, 2017 02:05 IST

कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सीसोबतच अन्य भूमाफियांवरही आता पोलिसांनी नजर रोखली आहे.

विशेष तपास पथकाचे संकेत : नगरसेवक कमलेश चौधरी अडचणीत लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सीसोबतच अन्य भूमाफियांवरही आता पोलिसांनी नजर रोखली आहे. त्यानुसार पुढच्या काही तासात एका नगरसेवक आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर गुन्हे दाखल होण्याचे संकेत विशेष तपास पथकाकडून मिळाले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीचे एसीपी सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे पुन्हा पाच पीडितांनी तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, लोकमतने उपराजधानीतील भूमाफियांविरुद्ध घेतलेल्या बेधडक भूमिकेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. अनेक पीडित आणि सर्वच क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आज लोकमत कार्यालयात प्रत्यक्ष येऊन आणि फोन करून लोकमतचे अभिनंदन केलेले आहे. भूमाफिया ग्वालबन्सी आणि त्याच्या टोळीतील गुन्हेगारांविरुद्ध आतापावेतो एकूण १६ गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यातील तक्रारकर्ते आणि गुन्ह्यांशी संबंधित भक्कम पुराव्याची साखळी जोडण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एसीपी वाघचौरे यांच्या कार्यालयात पाच पीडितांनी तक्रारी नोंदविल्या. त्यात ग्वालबन्सी टोळीसारखीच गुंडगिरी करून ११ हजार चौरस फुटाच्या भूखंड विक्रीचा सौदा केल्यानंतर त्याची रक्कम घेऊन विक्रीपत्र करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कमलेश चौधरीविरुद्धच्या एका तक्रारीचाही समावेश आहे. या तक्रारकर्त्यानुसार, ११ हजार चौरस फूट जागा दाखवून कमलेश आणि त्याच्या काही साथीदारांनी लाखो रुपये घेतले. मात्र, या जमिनीची विक्री किंवा ताबा दिला नाही. यासंबंधाने वारंवार मागणी केल्यामुळे आरोपी चौधरी आणि त्याच्या साथीदारांनी तक्रारकर्त्याला धमक्या देणे आणि अन्य प्रकार अवलंबले. चौधरीविरुद्धच्या तक्रारीत एका नगरसेवकाचाही समावेश आहे. पोलिसांनी ही तक्रार आज नोंदवून घेतली. त्यामुळे पुढच्या काही तासात या प्रकरणातही महत्त्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकमतने सोमवारच्या अंकात उपराजधानीतील अनेक भागात ग्वालबन्सीसारख्या अनेक भूमाफियांची पिलावळ वळवळत असल्याचे वृत्त बेधडकपणे प्रकाशित केल्याने भूमाफिया आणि त्यांच्या साथीदारांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. उलट सर्वसामान्य नागरिक आणि पीडितांमध्ये लोकमतच्या भूमिकेचे स्वागत केले जात आहे. अनेक मान्यवरांनी आज प्रत्यक्ष भेटून, फोन करून लोकमतने भूमाफिया तसेच त्यांच्या टोळ्यांविरुद्ध घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे. काटोल मार्गावरील कोट्यवधींची जमीन हडपून त्यावर झोपडपट्टी वसविण्याचे नवे प्रकरण पुढे आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, १५ ते १७ एकर जमीन काही दिवसांपूर्वी नागपूरबाहेरच्या व्यक्तींनी काही वर्षांपूर्वी भागीदारीत विकत घेतली होती. त्यातील काही जमिनीवर ग्वालबन्सी टोळीने कब्जा केला. तेथील २०० ते ३०० फुटांचे भूखंड कुणाला ५० हजार, कुणाला एक लाख तर कुणाला दोन लाखात विकले. हे भूखंड विकत घेणाऱ्यांनी तेथे आपल्या घामाच्या कमाईतून स्वप्नातील घर बांधले. मात्र, आता पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारल्यामुळे भूमाफिया ग्वालबन्सीसोबतच लाखो रुपये घेऊन आपले घर बांधणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे. चार दिवसांपूर्वी पोलिसांनी तवक्कल सोसायटीतील ३०० पेक्षा जास्त घरे जमिनदोस्त केली. त्यातील अनेकांनी भूमाफिया ग्वालबन्सीला लाखो रुपये देऊन तेथे जमीन घेतली होती. ग्वालबन्सीने हे बेकायदेशीर कृत्य केल्यामुळे गव्हासोबत सोंडा भरडला जावा, तशी त्याच्याकडून जमीन खरेदी करून तेथे घर बांधणाऱ्यांची अवस्था झाली आहे.