शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भुईमूग व्यावसायिकांना गंडविणारी गुजरातची टोळी विदर्भात सक्रिय!

By admin | Updated: June 23, 2016 22:03 IST

विदर्भात उन्हाळी भुईमुगाचा पेरा जास्त; अनेक व्यापा-यांना लावला लाखोंचा चुना.

गणेश मापारी / खामगाव (जि. बुलडाणा)लाखो रुपयांच्या भुईमूग शेंगा खरेदी करून पैसे न देताच फरार होणारी गुजरात राज्यातील कथित व्यापार्‍यांची टोळी विदर्भात सक्रिय झाली आहे. अकोला, बुलडाणा येथील व्यापार्‍यांची फसवूणक करणार्‍या या टोळीने आर्णी, वर्धा व यवतमाळमध्येही भुईमूग व्यावसायिकांना गंडविल्याची माहिती प्राप्त झाली आहे.विदर्भात उन्हाळी भुईमुगाचा पेरा जास्त असल्याने दरवर्षी गुजरातमधून व्यापारी विदर्भात खरेदीसाठी येतात. यावर्षीही गुजरातमधील अनेक व्यापार्‍यांनी विदर्भातून कोट्यवधी रुपयांच्या भुईमूग शेंगा खरेदी केल्या. या व्यापाराचे विदर्भ-गुजरात कनेक्शन पाहता, गुजरातमधील बोगस व्यापार्‍यांची एक टोळीच विदर्भात दाखल झाली आहे. गुजरातमधील जामनगर, राजकोट येथील नामांकित व्यापार्‍यांची पूर्ण माहिती घेऊन या टोळीतील सदस्य विदर्भातील वेगवेगळ्या कृषिउत्पन्न बाजार समित्यांमध्ये जातात. भुईमूग खरेदी करण्यापूर्वी आपण राजकोट किंवा जामनगर येथील बडे व्यावसायिक असल्याचे ते येथील व्यापार्‍यांना पटवून देतात. त्यानंतर शेंगा खरेदीचे एक-दोन व्यवहार सुरळीतपणे करतात आणि व्यापार्‍यांचा विश्‍वास संपादन झाल्यानंतर जास्त माल खरेदी करून, पैसे न देताच गायब होतात. या प्रकारातून आकोट येथील दीपक अग्रवाल यांची १५ लाख रुपये, तर खामगाव येथील दीपक देशमुख यांची ३४ लाख रुपयांनी बटुकभाई नामक कथित व्यापार्‍याने फसवणूक केली आहे. याबाबत पोलिसांत तक्रारी करण्यात आल्या आहेत.  केवळ शेंगाचीच खरेदीभुईमूग शेगांना विदर्भात तसेच महाराष्ट्रात चांगले खरेदीदार मिळत नाहीत. त्यामुळे विदर्भातील व्यापारी भुईमूग शेंगांची विक्री गुजरात राज्यात करतात. हीच बाब हेरून बटुकभाईने केवळ भुईमूग शेंगा खरेदीचा डाव आखला. यासाठी संबधित व्यापार्‍यांचे गुजरातमधील काही बड्या व्यावसायिकांशी बोलणेही करून दिले; परंतु बोलणे करून दिलेले व्यापारीच आहेत की आणखी कोणी, ही बाब आता पोलीस तपासात समोर येणार आहे.  पोलीस तपासणार सीसीटीव्ही फुटेजभुईमूग शेंगांची खरेदी करण्यासाठी बटुकभाई सतत अकोला, अकोट व खामगाव येथे येत असे. त्यामुळे खामगाव व आकोट कृषिउत्पन्न बाजार समितीमधील क्लोज सर्किट कॅमेर्‍यांतील फुटेजची माहिती पोलीस घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी व्यापार्‍यांशी चर्चा करताना त्याने नाव घेतलेल्या अकोला येथील काही गेस्ट हाउसमधील फुटेजही तपासले जाणार आहेत.