शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात तयार झाली म्युकरमायकोसिस सर्जरीची गाईडलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोना संक्रमणानंतर म्युकरमायकोसिसचा धोका वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. परंतु यावरील शस्त्रक्रियेला घेऊन दिशानिर्देश (गाईडलाईन) नव्हते. परिणामी, उपचार ...

नागपूर : कोरोना संक्रमणानंतर म्युकरमायकोसिसचा धोका वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. परंतु यावरील शस्त्रक्रियेला घेऊन दिशानिर्देश (गाईडलाईन) नव्हते. परिणामी, उपचार करणे कठीण झाले होते. मध्यभारतातील प्रसिद्ध ईएनटी विशेषज्ञ आणि हेड अ‍ॅण्ड नेक ऑन्कोलॉजीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मदन कापरे, डॉ. नीती कापरे आणि नीती क्लिनिकचे डॉक्टर, परिचारिका यांनी मिळून केलेल्या १२९ म्युकरमायकोसिसवरील शस्त्रक्रियेचे विश्लेषण केले. त्या आधारावर शस्त्रक्रियेची गाईडलाईन तयार करण्यात त्यांना यश आले.

‘इंडियन जर्नल ऑफ आटोलॅरिंगोलॉजी’मध्ये (आयजेएलओ) म्युकरमायकोसिसवरील शस्त्रक्रियेची ही गाईडलाईन प्रकाशित झाली आहे. यामुळे नागपूर पुन्हा एकदा गंभीर रोगाच्या उपचाराच्या क्षेत्रात पुढे आले आहे. येथील मानक राष्ट्रीय स्तरावरील सर्जरीच्या पद्धतीसाठी वापरले जाणार आहे. डॉ. मदन कापरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या आजारावरील शस्त्रक्रियेसाठी कोणतेही दिशा-निर्देश नव्हते. यामुळे कान, नाक व घसा (ईएनटी) तज्ज्ञांना शस्त्रक्रिया करताना अडचणीचे जात होते. नीती क्लिनीकमध्ये १२९ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यात रुग्णाची शस्त्रक्रिया करणे सुरक्षित आहे का, जर सुरक्षित नसेल तर रुग्णाला कधीपर्यंत शस्त्रक्रियेपासून थांबवून ठेवता येते, जर शस्त्रक्रिया करायची असेल तर कोणत्या पद्धतीने करावी, आदींचा अभ्यास करून शस्त्रक्रियेचे विश्लेषण केले. त्यानंतर त्याची माहिती संकलित करून त्या आधारावर गाईडलाईन तयार करण्यात आली. ‘आयजेएलओ’मध्ये ही गाईडलाईन प्रकाशित झाल्याने राष्ट्रीय स्तरावर याचा उपयोग होणार आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये या गाईडलाईन्सलाही प्रकाशित केले जाणार आहे.

-गंभीर रुग्णांची शस्त्रक्रिया कठीण

डॉ. कापरे म्हणाले, कोरोनाचा गंभीर रुग्णांचे फुफ्फुस बºयाच प्रमाणात प्रभावित झालेले असते. यामुळे म्युकरमायकोसिसवरील शस्त्रक्रिया आणखी कठीण होती. काही दिवसांसाठी शस्त्रक्रिया टाळण्याचा प्रयत्नही होतो. म्युकरमायकोसिस वेगाने पसरत असल्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते.