भिवापूर: खरीप हंगाम तोंडावर आहे. त्यामुळे शेतकरी शेताची मशागत, खते व बियाण्यांची खरेदी आदी कामात गुंतला आहे. अशात बियाणे व खतांची खरेदी व वापर करताना योग्य मार्गदर्शनाअभावी शेतकऱ्यांची फसगत होते. त्यामुळे उगवणशक्ती, बीज प्रक्रिया, रासायनिक खतांच्या वापराबाबत शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रत्येक गावात कार्यशाळा घेतल्या जात आहे. यात शेतकरीबांधवांना खरीप हंगामाबाबत कृषी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जात आहे. तालुक्यातील वासी येथे अशाप्रकारच्या कार्यशाळेचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते. शेतकऱ्यांशी संवाद साधत खरीप हंगामात कोणत्याही पिकाची पेरणी करताना नुकसान होऊ नये म्हणून बियाण्यांची उगवणशक्ती तपासणे, बीजप्रक्रिया करणे, रासायनिक खतांचा १० टक्के कमी वापर करणे, रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीनची पेरणी करणे, उगवणशक्ती तपासून पेरणी करावी, बियाण्याला बुरशीनाशके व जीवाणू खते यांची बीजप्रक्रिया करावी, बियाण्यांची पेरणी बीबीएफ यंत्राद्वारे करावी, रासायनिक खतांचा वापर १० टक्के कमी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे यांनी बीबीएफ पद्धतीने सोयाबीनची पेरणी करावी, असे आवाहन करण्यात आले. मंडळ कृषी अधिकारी श्याम गिरी यांनी रासायनिक खतांचा वापर १० टक्के कमी करण्याबाबत मार्गदर्शन केले. बियाण्यांची उगवणशक्ती तपासणीचे प्रात्यक्षिक कृषी सहायक एस.व्ही. मेंघरे यांनी तर बियाणास बीजप्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक कृषी सहायक पी.एस. कळसकर यांनी करून दाखवले. कृषी पर्यवेक्षक एस.बी. झाडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेला वासी येथील शेतकरीबांधव उपस्थित होते.
===Photopath===
290521\img-20210529-wa0079.jpg
===Caption===
वासी येथील शेतक-यांशी खरीप हंगामाबाबत मनमोकळ्या चर्चा करतांना तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे