नागपूर : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकु ळे यांनी सोमवारी रविभवन येथे नागपूर शहर व जिल्ह्यातील विविध विषयांवर आढावा बैठक घेतली. या बैठकीला महापौर प्रवीण दटके, खासदार रामदास तडस, आमदार सुधाकर देशमुख व स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे उपस्थित होते. यावेळी बावनकुळे यांनी सुराबर्डी ग्रामपंचायत येथील सुराबर्डी तलाव परिसरात अतिक्रमण करू न बांधकाम केलेले स्मशान घाट, सार्वजनिक शौचालय, परिसरातील प्रदूषण व घाण हटविण्याचे निर्देश दिले. तसेच ५९ वी वरिष्ठ गट राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत- २०१५ च्या नागपूर येथील आयोजनाबाबत क्रीडा विभागाचे उपसंचालक विजय संतान यांच्याशी चर्चा केली.शिवाय नागपूर महानगरपालिकेतर्गंत हनुमाननगर झोनमधील मौजे हुडकेश्वर व नेहरू नगर येथील नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या पायाभूत सोयी सुविधांचा आढावा घेतला. दरम्यान मनपातर्फे आकारण्यात येणारा घर टॅक्स, पाणी पट्टी कर, वीज व पथदिव्यांबाबत नागरिकांच्या विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यांच्या निवारणासंबंधी यावेळी चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा
By admin | Updated: August 11, 2015 03:35 IST