शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआरपी’त जीएसटीचा गोलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:33 IST

देशात जीएसटी(वस्तू व सेवा कर)च्या नावावर ग्राहकांची लूट सुरू आहे. बहुतेक व्यापारी वस्तूच्या ‘एमआरपी’(कमाल किरकोळ किंमत)वर सीजीएसटी(केंद्रीय वस्तू व सेवा कर)व एसजीएसटी(राज्य वस्तू व सेवा कर)वसूल करीत आहेत.असे करणे अवैध आहे.

ठळक मुद्देग्राहकांची होतेय लूट अज्ञानाचा गैरफायदा बिलावर टॅक्स स्लॅबचा उल्लेख नाही

धीरज शुक्ला।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात जीएसटी(वस्तू व सेवा कर)च्या नावावर ग्राहकांची लूट सुरू आहे. बहुतेक व्यापारी वस्तूच्या ‘एमआरपी’(कमाल किरकोळ किंमत)वर सीजीएसटी(केंद्रीय वस्तू व सेवा कर)व एसजीएसटी(राज्य वस्तू व सेवा कर)वसूल करीत आहेत.असे करणे अवैध आहे.ग्राहकाने ‘एमआरपी’एवढी रक्कम देऊन वस्तू खरेदी केल्यास त्यात ‘जीएसटी’चा समावेश असतो. परंतु अनेक दुकानदार ‘एमआरपी’वर ‘जीएसटी’ लावत आहेत. त्यामुळे कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन होत आहे. जीएसटी ठरविण्याची व व्यापाºयांकडील कर सरकारी खात्यात जमा करण्याची जबाबदारी वस्तू व सेवा कर विभागावर आहे तर, वस्तूचे वजन व किमतीचा भाग वजन व मापे विभागाच्या अख्त्यारित येतो. १ जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर साठवलेला माल विकण्यासाठी कंपन्यांना मुदत देण्यात आली होती. ती मुदत संपल्यानंतर‘जीएसटी’चा समावेश करून एमआरपी निश्चित करण्यात आली तसेच वस्तू‘एमआरपी’नुसार विकण्याचे निर्देश देण्यात आले. परंतु बहुतेक व्यापारी अनधिकृतपणे ‘एमआरपी’वर ‘जीएसटी’ लावत आहेत.आयुक्तांकडे करावी तक्रारनियमापेक्षा जास्त ‘जीएसटी’ वसूल करणाºया व्यापाºयाविरुद्ध जीएसटी आयुक्त किंवा उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार केली जाऊ शकते. तसेच अवैध नफाखोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापित केंद्रीय व राज्यस्तरीय चौकशी समितीकडेही थेट तक्रार करता येते.- ओमनारायण भांगडिया, सदस्य, राज्यस्तरीय चौकशी समिती (जीएसटी).कडक कारवाई होऊ शकते‘जीएसटी’च्या नावावर अधिक रक्कम वसूल केली जात असल्यास वजन व मापे विभागाकडे तक्रार करता येते. तसेच नियमापेक्षा जास्त ‘जीएसटी’ लावला जात असल्यास अवैध नफाखोरीसाठी कारवाई केली जाऊ शकते. चौकशीनंतर दोषी आढळून येणाºया व्यापाºयाला ग्राहकांकडून वसूल केलेली अतिरिक्त रक्कम परत करावी लागेल. त्याशिवाय व्यापाºयाची ‘जीएसटी’ नोंदणी रद्द होऊन त्याला कारावास व दंडदेखील होऊ शकतो.- पूनमचंद अग्रवाल,राज्य कर सहआयुक्त.