शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीमध्ये बालकांची ‘ग्रोथ मॉनिटरिंग’ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:49 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे अंगणवाडीत येणाऱ्या बालकांच्या ‘ग्रोथ मॉनिटरिंगचे’ काम बंद होते. त्यामुळे बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाने बालकांचे ‘ग्रोथ मॉनिटरिंग’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे अंगणवाडीत येणाऱ्या बालकांच्या ‘ग्रोथ मॉनिटरिंगचे’ काम बंद होते. त्यामुळे बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाने बालकांचे ‘ग्रोथ मॉनिटरिंग’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात तीव्र व अतितीव्र कुपोषित बालकांची माहिती विभागाला मिळणार आहे.एकात्मिक बाल विकास प्रकल्पाकडे बालकांचा दर महिन्याला आढावा येतो. यात बालकांच्या कुपोषणाचीही माहिती मिळते. परंतु लॉकडाऊनमुळे तीन महिन्यापासून अंगणवाड्या बंद असल्यामुळे बालकांच्या आरोग्याबाबत विभागाकडे माहितीच नाही. ‘ग्रोथ मॉनिटरिंग’च्या माध्यमातून कुपोषित बालकांचा शोध सुरू करण्यात आला आहे. एका अंगणवाडी केंद्रात दिवसभरात पाच मुलांची तपासणी केली जाणार असून गरोदर व स्तनदा मातांनाही आरोग्याची माहिती दिली जाणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये २४२३ तर शहरी भागामध्ये ९८३ अंगणवाड्या आहेत. अंगणवाडीतून बालकांचे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी पूरक पोषण आहार दिला जातो. वेळोवेळी लसीकरणदेखील केले जाते. कोरोनामुळे अंगणवाडीचे काम बंद आहे. परिणामी बालकांचे पोषण, कुपोषित बालकांची स्थिती, लसीकरण ही कामे बंद आहेत. लॉकडाऊनच्या काळात तीव्र कुपोषित बालकांना पोषण आहार मिळण्यासाठी ‘होम ग्राम बाल विकास केंद्र’ सुरू करण्यात आले होते. त्याचबरोबर आता विभागाने बालकांचे ‘ग्रोथ मॉनिटरिंग’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रत्येक अंगणवाडीमध्ये दिवसभरातून पाच बालकांचे उंची व वजन घेऊन त्यांची नोंद घेतली जाणार आहे. याशिवाय गरोदर व स्तनदा मातांना आरोग्यविषयक माहिती दिली जाणार आहे. याशिवाय अंगणवाडी सेविका यांनी नियमित स्वरूपात गृहभेटी द्याव्यात तसेच गृहभेटी देताना अतितीव्र कुपोषित बालके, गरोधर माता यांना प्राधान्याने भेटी देण्यात याव्यात, यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना खबरदारीच्या केल्या सूचनारेड झोन म्हणून घोषित झालेल्या तसेच कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित असलेल्या ठिकाणी बालकांची वजन व उंची घेतली जाऊ नये. ज्या लाभार्थींना सर्दी, खोकला व ताप अशी लक्षणे असतील त्यांना अंगणवाडी केंद्रात बोलावण्यात येऊ नये. सामाजिक अंतराचे पालन करावे. सेविका व मदतनिसांनी मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, हात वारंवार साबणाने धुवावे, अशा सूचना देण्यात आल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी भागवत तांबे यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूर