नागपूर : आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शासकीय कार्यालयांसह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
विभागीय आयुक्त कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयातील सभाकक्षात उपायुक्त चंद्रभान पराते यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी तहसिलदार प्रताप वाघमारे, अरविंद सेलोकर तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे निवासी उप जिल्हाधिकारी जगदीश कातकर यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी तहसिलदार एस. इंगळे, सीमा गजभिये, नायब तहसिलदार सी. क्षेत्रपाल तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पीपल्स रिपब्लिकन पार्टी
पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे आनंदनगर, सीताबर्डी येथील पक्षाच्या मुख्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहर अध्यक्ष अरुण गजभिये, कपिल लिंगायत,बालू कोसंमकर,नरेंद्र डोंगरे, अजय चव्हाण,रामटेके गुरुजी,दिलीप पाटील,कैलाश बोम्बले,रोशन तेलरांधे,विपिन गड़गिलवार, प्रकाश मेश्राम, पीयूष हलमारे, अक्षय नानवटकर,महिंद्र पावड़े,शेखर वरखडे,नवीन जॉन,भोला शेंडे,शैलेश धनाडे,स्वनिल महल्ले,राहुल पांडे,नीलेश बोरकर, सूरज सिंग,उत्तम हुमने, भीमराव कळमकर आदी उपस्थित होते.
बसपा
बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने विभागीय कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रदेश महासचिव नागोराव जयकर व प्रदेश कार्यालय सचिव उत्तम शेवडे नितीन शिंगाडे, विजयकुमार डहाट, संदीप मेश्राम, इंजिनियर राजीव भांगे, मनपा पक्षनेता जितेंद्र घोडेस्वार, आशीनगर झोन सभापती वंदना चांदेकर, नगरसेविका वैशाली नारनवरे, सुनंदा नितनवरे, रंजना ढोरे, बबीता डोंगरवार, सुरेखा डोंगरे, वर्षा वाघमारे, सागर लोखंडे, विलास पाटील, अभय डोंगरे, गौतम गेडाम आदी उपस्थित होते.