शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

By admin | Updated: November 29, 2015 03:35 IST

अखंड भारतात स्त्रीशिक्षणाचे जनक, थोर समाज सुधारक व जातीभेदाविरोधात बंड पेटविणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले ...

पुण्यतिथी : विविध संघटनांच्यावतीने कार्यक्रमांचे आयोजननागपूर : अखंड भारतात स्त्रीशिक्षणाचे जनक, थोर समाज सुधारक व जातीभेदाविरोधात बंड पेटविणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या १२५ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध संघटनांच्यावतीने महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. दलित, शोषित, पीडितांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी महात्मा फुले यांनी जीवनभर लढा दिला. सावित्रीबांर्इंच्या सोबतीने त्यांनी मुलींसाठी भारतातील पहिली शाळा काढली. त्यांच्या कार्यामुळेच बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरू मानले होते. शहरात ठिकठिकाणी कार्यक्रमांच्या माध्यमातून जोतिबांच्या कार्याची आठवण करीत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भारतीय रिपब्लिकन परिषदभारतीय रिपब्लिकन परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या १२५व्या पुण्यतिथीनिमित्त कॉटन मार्केट येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष असंघ रामटेके यांनी यावेळी ज्योतिबा व सावित्रीआई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. यावेळी परिषदेचे अ‍ॅड. देवमन मेश्राम, आसाराम नारनवरे, मिलिंद नितनवरे, अशोक मडावी, अजय मेश्राम, सुनील राऊत, रवी सहारे, शकुंतला कांबळे, मीना गेडाम, कीर्ती रामटेके, प्रतिमा नारनवरे, मिनु नारनवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.इंदोरा वॉर्ड काँग्रेस कमिटीथोर समाजसुधारक ज्योतिराव फुले यांच्या १२५ व्या पुण्यतिथीनिमित्त इंदोरा वॉर्ड काँग्रेस कमिटीच्यावतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इंदोरा मिशन मोहल्ला येथील कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करून महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभाग अध्यक्ष दिनेश घरडे, राजू मेश्राम, रवींद्र जनबंधू, मिलिंद गोंडाणे, पांडुरंग सहारे, चंद्रकांत जांभुळकर, राज सुखदेवे, जयप्रकाश भिवगडे, महेश खोब्रागडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पंचशील नाईट हायस्कूलपंचशील नाईट हायस्कूल, बाबुळखेडा येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचा पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा मोहोड, संचालक प्राचार्य प्रल्हाद गजबे, पर्यवेक्षिका शालिनी जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांसह शाळेचे शिक्षक राजू ठोमरे व बाबाराव डोंगरे यांनी जोतिबांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी संजय मेंढुले, नारायण हेमणे, सुनीता भुते आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.भारिप बहुजन महासंघमहात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारिप बहुजन महासंघाच्या वतीने महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहर अध्यक्ष विनोद गजभिये, धर्मपाल धाबर्डे, अंबादास गजभिये, प्रमोद मंडपे, जनार्दन खोब्रागडे, पृथ्वीपाल धाबर्डे, डॉ. अश्विन नंदागवळी, रजनीकांत कांबळे, वनमाला उके, निरंजना गजभिये, अनिता धाबर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते.भारतीय जनता पक्षभारतीय जनता पार्टी व दलित मित्रच्यावतीने महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार घोषित करण्याच्या मागणीसाठी यावेळी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी दलित मित्रचे योगेश वागदे, ज्येष्ठ भाजपा नेते आनंदराव ठवरे यांनी पुतळ्याला माल्यार्पण करून श्रद्धांजली वाहिली. भाजपाचे शहर उपाध्यक्ष भूषण दडवे यांच्या नेतृत्वात धरणे देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाकडे तसा प्रस्ताव पाठविला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. धरणे कार्यक्रमात वामनराव कोंबाडे, रूपराव राऊत, मायाताई घोरपडे, मंदाताई वैरागडे, रमेश कोलते, विजय हरडे, ओंकार सुर्यवंशी, गणेश भांडारकर, शमशुद्दीन अन्सारी, राजश्री सेन, भाजपा युवा मोर्च्याचे मयुरेश दडवे आदी उपस्थित होते.विठ्ठलराव खोब्रागडे बी.एड. कॉलेजविठ्ठलधाम चाम्पा येथील विठ्ठलराव खोम्रागडे बी.एड. कॉलेज येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष जगदीश देशमुख, प्राचार्य संजय सहारे, यांनी फुलेंच्या जीवनावर मार्गदर्शन करीत ग्रामीण महिला व शिक्षण चळवळ या विषयावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन नितीन भागवत यांनी केले. विनायक भांगे यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ. प्रकाश खंडाईत, प्रा. माधुरी वाघमारे, प्रा. मंगला लोहेकर, डॉ. प्रज्ञा खंडाईत, गोविंद कुर्झेकर, अनिल पाठे आदी उपस्थित होते.महात्मा फुले समता परिषदअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने महात्मा फुले यांना कॉटन मार्केट येथील प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने परिषदेचे महानगर अध्यक्ष श्याम चौधरी, कार्याध्यक्ष अरविंद लोखंडे, प्रा.एस.के. सिंह, अल्काताई कांबळे, रमेश गिरडकर, राजेश राहाटे, राजू रंगारी, कपिल उमाळे, चिंतामण लक्षणे, शैलेश मानकर, विकास अंभोर, संजय आरघोडे, नरेंद्र आगलावे, पंकज बोरकर आदी उपस्थित होते.सुगत वाचनालय संस्थासुगत वाचनालय संस्था व सुगत बुद्ध विहार, गरोबा मैदान, बाबुळबन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भन्ते संघघोष यांच्या अध्यक्षतेत व सुगत वाचनालयाचे अध्यक्ष विजय मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. संघघोष यांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांना गुरू मानले व त्यांचे कार्य पुढे नेले. बहुजन समाजाच्या लोकांनी हे कार्य आणखी पुढे नेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन समितीचे सहसचिव रावसाहेब पाटील यांनी केले तर विजयकुमार खोब्रागडे यांनी आभार मानले. बाबा रंगारी, विलास मेश्राम, प्रमिला बागडे, बेला मानवटकर, नाना शंभरकर, दीपक खोब्रागडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.अखिल भारतीय माळी महासंघसामाजिक परिवर्तनाचे प्रणेते महात्मा जोतिबा फुले यांच्या १२५ व्या पूण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय माळी महासंघांच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. महासंघाचे राष्ट्रीय महासचिव अविनाश ठाकरे व महासंघाचे शहर अध्यक्ष गोविंद वैराळे यांनी जोतिबांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. यावेळी ग्रामीण अध्यक्ष रमेश गिरडकर, नाना लोखंडे, मधुसूदन देशमुख, रामेश्वर भोपळे, वसुधाताई येणकर, अ‍ॅड. नितीन देशमुख, मिलिंद पाचपोर, बाळकृष्ण येणकर, राजेंद्र पाटील व प्रसिद्धी प्रमुख देवराव प्रधान आदी पदाधिकारी उपस्थित होते.शहर महिला काँग्रेस कमिटीनागपूर शहर महिला काँग्रेस कमिटीच्यावतीने महात्मा जोतिबा फुले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहर अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी नगरसेविका हर्षदा साबळे, संध्या ठाकरे, संगीता उपरीकर, नलिनी करांगळे, विजयालक्ष्मी हजारे, पूजा गावंडे, अंजना मडावी, ललिता साहू, सोनिया सिंग, स्नेहल दहिकर, कविता हिंगणकर, विमल वाघमारे, धनश्री बावणे, अर्चना चोपडे, शुभांगी चिंतलवार, माया घोरपडे आदी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.