शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन कॉरिडोरमुळे बसेल वायुप्रदूषणाला आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरातील वायुप्रदूषणाला आळा बसावा शहरातील रस्ता दुभाजकावर ग्रीन कॉरिडोर निर्माण करण्याची योजना तयार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरातील वायुप्रदूषणाला आळा बसावा शहरातील रस्ता दुभाजकावर ग्रीन कॉरिडोर निर्माण करण्याची योजना तयार केली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारकडून एनसीएपी उपक्रमांतर्गत यासाठी निधी मिळाला आहे. यामुळे बिकट आर्थिक स्थितीचा सामना करीत असलेल्या महापालिकेला थोडा दिलासा मिळाला आहे.

एक कोटी ८९ लाख ८० हजार ३५९ रुपयाचा प्रस्ताव मनपाच्या उद्यान विभागातर्फे तयार करण्यात आला आहे. शहरातील आठ झोनमधील रस्ता दुभाजकावर हिरवळ लावली जाणार आहे. वायुप्रदूषणाला आळा बसावा यासाठी झाडे लावली जाणार आहेत. शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. याला मंजुरी मिळण्याची आशा आहे. मनपातर्फे वायुप्रदूषण अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे.

लक्ष्मीनगर व धरमपेठ झोनच्या रस्ते दुभाजकावर ग्रीन कॉरिडोरसाठी ३८ लाख ७३ हजार ९३४ रुपये, हनुमाननगर व धंतोली झोनसाठी ४६ लाख २७ हजार ५७ रुपये, नेहरूनगर झोनसाठी ५२ लाख ९३ हजार १८८ रुपये, मंगळवारी झोनसाठी ५१ लाख ३६ हजार १७९ रुपयाचा प्रस्ताव तयार केला आहे. नेहरूनगर झोनमधील रस्त्यावर सर्वाधिक हिरवळ निर्माण करणार आहे. गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमधील रस्ते जास्त रुंद नाही. तसेच रस्ता दुभाजकही व्यवस्थित नाही. यामुळे या झोनचा यात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र या दोन झोनमध्ये सर्वाधिक प्रदूषण आहे.

...............

५० सामुदायिक जल शुद्धीकरण मशीनला ब्रेक

नगरोत्थान योजनेंर्गत नागपूर शहरात १ हजार प्रति तास क्षमतेचे ५० सामुदायिक जल शुद्धीकरण मशीन (आरओ व यूपी) लावण्याची योजना होती. ११.०९ कोटी रुपयाच्या या योजनेला १४ ऑगस्ट २०१९ रोजी प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली. ५ डिसेंबर २०१९ ला हा निधी खर्च करण्याला राज्य सरकारने निर्बंध घातले. यामुळे प्रत्येक झोनमधील प्रस्तावित ५० सामुदायिक जल शुद्धीकरण मशीनला ब्रेक लागला.