शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
7
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
8
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
9
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
10
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
11
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
12
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
13
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
14
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
15
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
16
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
17
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
18
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
19
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
20
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर

उपराजधानीत महा‘सेलिब्रेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 10:05 IST

गुरुवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले अन् शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह संचारला.

ठळक मुद्देशहरात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांकडून जल्लोषराऊत समर्थकांमध्ये संचारला उत्साहमहाविकास आघाडीमध्ये आनंदाची लाट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुरुवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले अन् शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह संचारला. डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तर उत्तर नागपुरसह विविध भागांमध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी तिन्ही पक्षांचे पदाधिकारी एकत्रित आले होते. याशिवाय नागपूर महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वातदेखील आनंदोत्सव साजरा करण्यात आला.राऊत यांच्या बेझनबागस्थित कार्यालयात काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. ढोलताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी ताल धरला. परिसरात मिठाई वाटण्यात आली तसेच गुलालाची उधळण करीत आतषबाजीदेखील झाली. राऊत मंत्री झाल्याने संपूर्ण शहरासोबतच उत्तर नागपुरात विकास कार्यांनादेखील गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, काँग्रेस सेवादलाचे संघटक कृष्णकुमार पांडे, प्रदेश प्रवक्ते संजय दुबे, उपाध्यक्ष ठाकूर जग्यासी, सुरेश जग्यासी, नगरसेवक दिनेश यादव, परसराम मानवटकर यांच्यासह किशोर जिचकार, फिलिप जायस्वाल, कांता पराते, बेबी गौरीकर, नितीन कुंभलकर, अजित सिंह, धीरज पांडे, आशिष मंडपे, तुषार नंदगवळी, गौतम अंबादे, नीलेश चंद्रिकापुरे, आसीफ शेख, आमिर नूरी, बॉबी दहीवले, राम यादव उपस्थित होते.

सोमलवाडा चौकात शिवसेनेचा जल्लोषसोमलवाडा चौकात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. भगवा झेंडा हातात घेत पदाधिकाºयांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. यावेळी शिवसेनेचे विदर्भ प्रदेश प्रवक्ता किशोर कन्हेरे, चंद्रहास राऊत, सिद्धू कोमजवार, गजानन चकोले, ऋषी कारुंडे, श्याम चौधरी, विकास अंभोरे उपस्थित होते.

भारतमाता चौकात आतषबाजीभारतमाता चौकात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी जल्लोष केला. यावेळी चौकात आतषबाजी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सूरज गोजे, विलास मामुलकर, राजेश कनौजिया, अनिल बोरकर, गुलाम पोठियावाला, केतन रेवतकर, राजेश माथूरकर, श्याम तेलंग, सुरेखा खोब्रागडे, शिल्पा थोटे, योगिता रेंघे, सरोज वैष्णव, अंजली बाजीराव, सुशील कोल्हे, विकास देशमुख, सागर मौंदेकर, नरेश मोहाडीकर, तेजस गोजे, सुखदेव ढोके उपस्थित होते.

मनपात काँग्रेसचा जल्लोषराज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासोबत थोरात, आमदार डॉ. नितीन राऊ त, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व आमदार छगन भुजबळ आदींनी मंत्रिपदाची शपथ घेताच महापालिका मुख्यालयाच्या हिरवळीवर काँग्रेसतर्फे जल्लोष करण्यात आला. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्यासह नगरसेवक जुल्फेकार अहमद भुट्टो, दिनेश यादव, कमलेश चौधरी, परसराम मानवटकर, किशोर जिचकार, सय्यदा निजाम अन्सारी, माजी नगरसेवक मनोज साबळे, यशवंतराव कुंभलकर, नितीन कुंभलकर, कृष्णकुमार पांडे, देवराव तिजारे, अनिल मछले, बाबा वकील, गोविंद जोशी, चंदू वाकोडकर, चंदू वनवे, आमीन नूरी, अभिषेक सिंग यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते जल्लोषात सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मंत्री डॉ. नितीन राऊ त आदींचे फलक उंचावून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

खासदार तुमाने यांच्या कार्यालयाबाहेर आनंदोत्सवशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेल्यानंतर खासदार कृपाल तुमाने यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी कार्यालयाबाहेर मोठी स्क्रीन लावण्यात आलेली होती. तुमाने यांचे पुत्र गौरव तुमाने आणि अन्य शिवसैनिक यांनी मिठाई वाटून आणि आतषबाजी करून आनंद साजरा केला. यावेळी जयेश तुमाने, अमित कातुरे हेदेखील उपस्थित होते.

इतवारी मिरची बाजारात नागरिकांचे तोंड गोडमुख्यमंत्री तसेच मंत्र्यांचा शपथग्रहण सोहळा झाल्यानंतर काँग्रेस व शिवसेना कार्यकर्त्यांनी इतवारी मिरची बाजारात एकत्रित येऊन जल्लोष केला. यावेळी नागरिकांचे तोंड मिठाई वाटप करून गोड करण्यात आले. यावेळी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष इरशाद अली, ज्ञानेश्वर ठाकरे, अमित शिंदे, जुनैद अहमद, सरफराज खान, विलास बारस, आरिफ खान, गंगाधर बावनकुळे, अमन शेख, कुणाल चौधरी, शिवसेना शहर प्रमुख किशोर राठोड, विनोद जाधव, जगन परमार, पितांबर गोलपे, नीतेश मसके, शेखर ढोके, युवराज परमार, अंशुल राठौड, राजू आदमने, रमेश कछवा, राजेश परमार, धर्मराज परमार, सुनील शर्मा उपस्थित होते.

सीताबर्डीत मिठाई वाटपसीताबर्डी येथील भाजीमंडी चौकात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याचा आनंद मनविण्यात आला. यावेळी ढोलताशांच्या गजरात जल्लोष झाला. यात बाबाराब गावंडे, लालसिंग ठाकूर, सचिन मोहोड, रेखा कृपाले, प्रमिला मर्दाने, दिनेश त्रिवेदी, सुनील ढोले, कल्पना वैद्य, प्रसाद धुपे, रतन शर्मा, रूपलता वंजारी, वर्षा ढवळे, राम नायडू, रमेश दुबे, योगेश ठाकरे, बन्सीलाल यादव, विजय चिटमिटवार, विश्वनाथ, सचिन साहू, दिनेश सुगंध पात्रे, सुदेश सहभागी झाले होते.

बिनाकीत गुलालाची उधळणडॉ. नितीन राऊत यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आनंदनगर, बिनाकी येथे जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीसह गुलालाची उधळण करण्यात आली. नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटीचे सचिव मंगेश सातपुते यांच्या नेतृत्वात झालेल्या या जल्लोषात रवींद्र सातपुते, धीरज सहारे, शेख शाहनवाज, अनिल कुकडे, राजू झाडे, साजिद शेख, योगेश सातपुते, अंकित रामटेके, रमेश ताडेकर, राजेश कोहाड उपस्थित होते.

धरमपेठेत ढोलताशांचा गजरमहाविकास आघाडी सरकारच्या शपथग्रहण सोहळ्याला सुरुवात झाल्यावर सायंकाळी धरमपेठेतील कॉफी हाऊस चौकात आतषबाजी करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात ताल धरला. यावेळी राजू दौलतकर, मनोज शाहू, बंटी गेडाम, विशाल नलगे, गुलशन बटानी, निखिल सातपुते,अ‍ॅड. अक्षय समर्थ, माजी नगरसेविका पद्माताई उईके, विभा गुप्ता, शालिनीताई कुमरे, बबलू ठाकूर, अभिषेक चौरसिया, सपन नेहरोत्रा, आनंद नगराळे, रोशन नलगे, अमित बाबरे, महेश ठाकूर, भीमराव इंगळे, स्वानंद धवड, पिंटू मिश्रा, राजाभाऊ गुलवाडे, स्वप्निल सातपुते, कमलेश शुक्ला, जय धोटे, राज मिश्रा उपस्थित होते.

राज्याची सेवा करण्याची संधीमहाविकास आघाडीने मला महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली आहे, त्यासाठी सर्व नेत्यांचे धन्यवाद. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी व माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनातून यश मिळू शकले. महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यावरच माझा भर असेल. ‘देश सर्वात अगोदर’ हाच आमचा नारा आहे. नवीन सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार, तरुण, महिला यांचा विकास होईल.-डॉ. नितीन राऊत, मंत्री, महाराष्ट्र सरकार

पक्षाने पुन्हा सन्मान केला : विनोद राऊतडॉ. नितीन राऊत हे काँग्रेस पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहिले आहेत. ते चौथ्यांदा विजयी झाले. पक्षाने त्यांना तिसºयांदा मंत्रिपद देऊन सन्मान केला आहे. आजचा प्रसंग आम्हा कुटुंबीयांसह उत्तर नागपुरातील जनता व काँग्रेस विचारांच्या लोकांसाठी आनंददायी आहे. डॉ. राऊत या संधीचा उपयोग जास्तीत जास्त लोकसेवेसाठी करतील, याचा आम्हाला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांचे बंधू विनोद राऊत यांनी व्यक्त केली.

शहर काँग्रेसतर्फे देवडियात जल्लोषराज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ होताच नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमेटीतर्फे चिटणीस पार्क येथील देवडिया काँग्रेस भवनात जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद व्यक्त के ला. यावेळी माजी शहर अध्यक्ष शेख हुसैन यांनी पदाधिकारी व कार्यक र्त्यांना मार्गदर्शन केले. शहर उपाध्यक्ष प्रा. दिनेश बानाबाकोडे, महासचिव अशोक निखाडे, विधी विभाग नागपूर शहर अध्यक्ष अ‍ॅड. अभय रणदिवे, दिलीप गांधी, रवि गाडगे पाटील, ब्लॉक अध्यक्ष गोपाल पट्टम, शहर सचिव तौशिक अहमद आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Governmentसरकार