शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नातवाने केली आजीची हत्या

By admin | Updated: December 26, 2016 02:29 IST

क्षुल्लक कारणावरून डोक्यावर कुऱ्हाड मारून दारुड्या तरुणाने वृद्ध आजीची हत्या केली.

नागपूर : क्षुल्लक कारणावरून डोक्यावर कुऱ्हाड मारून दारुड्या तरुणाने वृद्ध आजीची हत्या केली. रविवारी दुपारी १ वाजता पोलीस स्टेशन हुडकेश्वरच्या हद्दीतील पिपळा गावात ही घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपीचे नाव नितेश मनोहर शेंडे (वय २४) आहे. त्याच्या आईची आई लीलाबाई बिसनराव वाढई (वय ७०) रोज दारात बसायची.मात्र, तिचे दारात बसणे आरोपी नितेशला अजिबात पसंत नव्हते. त्यावरून तो नेहमी आजीसोबत वाद घालायचा. आईलाही शिवीगाळ करायचा. नेहमीप्रमाणे रविवारी दुपारी जेवण झाल्यानंतर १ वाजता लीलाबाई दारात बसली. तेवढ्यात नितेश तेथे आला. त्याने आजीला दारात बसल्याचे पाहून तिच्याशी वाद सुरू केला. तिला शिवीगाळ करीत आरोपीने वृद्ध लीलाबार्इंच्या डोक्यावर कुऱ्हाडीने मारून तिला गंभीर जखमी केले. नितेशची आई नलूबाई मनोहर शेंडे (वय ५०) मदतीला धावली. तिने आरडाओरड करून आरोपी नितेशला शेजाऱ्यांच्या मदतीने कसेबसे आवरले. जखमी लीलाबार्इंना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. आरोपी नितेशविरुद्ध त्याची आई नलूबार्इंनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. त्याची चौकशी सुरू असतानाच सायंकाळी ६ वाजता लीलाबाईला डॉक्टरांनी मृत घोषित केले.(प्रतिनिधी)