शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

ग्रामपंचायतीने दिला दिव्यांगांना उत्पन्नातील तीन टक्के वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 10:49 IST

डिगडोह या स्थानिक स्वराज्य संस्थेने आपल्या उत्पन्नातील तीन टक्के वाटा हा दिव्यांगांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी दिला आहे. तब्बल ७० दिव्यांगांना प्रत्येकी १५ हजार रुपये असे एकूण १० लाख ५० हजार रुपये समाज उत्थानासाठी या ग्रामपंचायतीने दिले.

ठळक मुद्देडिगडोह ग्रामपंचायतने जपली सामाजिक बांधिलकी साडेदहा लाखांची मदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरमसाट उत्पन्न झाले तरी उत्पन्नातील काही वाटा हा समाजाच्या उत्थानासाठी करायचा नाही, असा मनुष्य स्वभाव आहे. परंतु त्यातही काही अपवाद असतातच. विशेष म्हणजे, एखाद्या संस्थेकडे बऱ्यापैकी पैसा जमा झाला तरी त्या पैशाचा उपयोग सामाजिक दायित्वांतर्गत केला जात नाही, हे वास्तव आहे. मात्र त्याला आडफाटा दिला आहे डिगडोह ग्रामपंचायतने.डिगडोह या स्थानिक स्वराज्य संस्थेने आपल्या उत्पन्नातील तीन टक्के वाटा हा दिव्यांगांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी दिला आहे. तब्बल ७० दिव्यांगांना प्रत्येकी १५ हजार रुपये असे एकूण १० लाख ५० हजार रुपये समाज उत्थानासाठी या ग्रामपंचायतीने दिले. काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे मौदा तालुक्यातील रेवराल ग्रामपंचायतीनेही मदत केली होती. या माध्यमातून आता ग्रामपंचायतींमध्ये चांगला पायंडा पडत आहे.डिगडोह ग्रामपंचायतीने कर वसुलीचे उद्दिष्ट निधारित केले. ते उद्दिष्ट गाठल्याने उत्पन्नातील तीन टक्के निधी हा दिव्यांगांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता यावा, त्यांना साहित्य खरेदी करता यावे, यासाठी देण्याचा निर्णय घेतला. यानुसार एकूण ७० दिव्यांग बांधवांची यादी तयार करण्यात आली. त्या दिव्यांग बांधवांना प्रत्येकी १५ हजार रुपये याप्रमाणे तब्बल १० लाख ५० हजार रुपये देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यानुसार दिव्यांग बांधवांना बुधवारी (दि. १६) ग्रामपंचायतमध्ये आयोजित छोटेखानी कार्यक्रमात धनादेश सुपूर्द करण्यात आले.या कार्यक्रमाला सरपंच चेतनलाल पांडे, उपसरपंच रमेशसिंह राजपूत, ग्रामविकास अधिकारी दिगंबर लोहकरे, ग्रामपंचायत सदस्य कैलास गिरी, शालिनी काकडे, विनोद ठाकरे, बबन आव्हाले, प्रदीप कोटगुले, संदीप साबळे, राकेश उमाळे, मंगला रडके, इंद्रायणी काळबांडे, चंद्रमती चतुर्वेदी, रजनी शेंगर, नलिनी तोडासे, विद्या देवगडे, गायत्री पटले यांची प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते धनादेश देण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करणारी डिगडोह ही नागपूर जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

यांना केले अर्थसाहाय्यकर वसुलीतील तीन टक्के निधी हा दिव्यांग बांधवांना देण्यात आला. डिगडोह ग्रामपंचायतमध्ये अशा एकूण ७० दिव्यांग बांधव, भगिनींचा समावेश असून त्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यामध्ये नीलेश बन्सोड, मेहरा ढोरे, किरा भागवत, संदीप मडावी, क्षितिज भांगे, अरविंद हिवरे, ज्ञानेश्वर भगत, निहाल दोमकुंडवार आदींचा समावेश आहे. या सर्वांना दिव्यांग साहित्य, लॅपटॉप, शेवई मशीन, पीठ गिरणी, मासिक औषध आदी कामासाठी हा निधी देण्यात आला.

टॅग्स :Governmentसरकार