लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारी शहरातील २२ रेशन दुकानांतून धान्याचे वितरण झाले नाही. या दुकानदारांनी पीओएस मशीन्स परत पाठविल्यामुळे, धान्य वितरणाचे काम होऊ शकले नाही.
रेशन दुकानदार संघाच्या इशाऱ्यानुसार सोमवारी रेशन दुकानदारांनी पीओएस मशीन परत पाठविण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, सोमवारपासूनच मे महिन्यासाठीचे धान्य मोफत वितरित केले जात आहे. रेशन दुकानदार संघाचे अध्यक्ष गुड्डू अग्रवाल यांनी सांगितल्यानुसार, १ मेपर्यंत सर्व दुकानदार आपापल्या पीओएस मशीन अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयात परत करणार आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून छापरूनगर येथील रेशन दुकानदार संघाच्या कार्यालयात २२ मशीन्स ठेवण्यात आल्या होत्या.
यावेळी चंद्रशेखर कावळे, ताराचंद निनावे, सुनील जैस, प्रवीण वारे, राजू दरोडे, विक्की गुमगावकर उपस्थित होते.
..............