शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कचरा संकलनासाठी जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा : मनपा नवा पॅटर्न राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:05 IST

स्वच्छ व सुंदर शहारासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम केली जाणार आहे. घराघरातील कचरा विलगीकरण करून संकलित झाला तर स्वच्छतेची समस्याच राहणार नाही. याचा विचार करता आगामी मार्च महिन्यापासून शहराला दोन भागात विभाजित करून संकलनासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येतील. कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवर जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा बसविली जाणार आहे. नियंत्रण कक्षातून वॉकीटॉकीच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या जातील. कचरा संकलनाचा नवा पॅटर्न राबविला जाणार आहे.

ठळक मुद्देवॉकीटॉकीचा वापर केला जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छ व सुंदर शहारासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम केली जाणार आहे. घराघरातील कचरा विलगीकरण करून संकलित झाला तर स्वच्छतेची समस्याच राहणार नाही. याचा विचार करता आगामी मार्च महिन्यापासून शहराला दोन भागात विभाजित करून संकलनासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येतील. कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवर जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा बसविली जाणार आहे. नियंत्रण कक्षातून वॉकीटॉकीच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या जातील. कचरा संकलनाचा नवा पॅटर्न राबविला जाणार आहे.मार्च महिन्यात मे. कनक रिसोर्सेस मॅनजमेंट प्रा. या एजन्सीचा कंत्राट संपत आहे. यामुळे नवीन व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया व नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी गुरुवारी दिली.कचरा संकलन हा शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. यात घराघरातून कचरा संकलन करण्यासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येतील. ओला, सुका व जैविक कचरा वेगवेगळा संकलित केला जाणार आहे. अशा प्रकारची वाहने उपलब्ध केली जाणार आहे. प्रत्येक झोनक्षेत्रात ट्रान्सफर स्टेशन निर्माण करण्यात येईल. यात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल. भविष्यात डम्पिंगयार्डची गरजच भासणार नाही. आरोग्य विभाग मागील सहा महिन्यांपासून यावर काम करीत आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली. देशात अशा प्रकारची अद्ययावत यंत्रणा असलेल्या शहरांचा अभ्यास दौरा करून माहिती संकलित केली आहे. ज्या भागात मोठी वाहने जाणे शक्य होणार नाही, अशा ठिकाणी ई-रिक्षांच्या माध्यमातून कचरा संकलित केला जाणार आहे. तसेच डम्पिंगयार्ड येथे कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती करण्यात येईल. कचरा संकलनाची नवीन यंत्रणा उभारली जात आहे.दहा वर्षात एक हजार कोटींचा खर्च‘कचराघर विरहित शहर’ योजना राबविली जाणार आहे. यासाठी १० वर्षांच्या कालावधीसाठी निविदा मागविण्यात येणार आहे. नागपूर शहरात दररोज ८०० ते १२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यावर दहा वर्षाच्या कालावधीत सुमारे एक हजार कोटींचा खर्च येणार आहे. याला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.वॉकीटॉकीच्या माध्यमातून नियंत्रणशहरातील कचरा संकलन, त्यावर प्रक्रिया व त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावली जाणार आहे. यासाठी कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवर जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा राहणार आहे. या यंत्रणेचे संचालन नियंत्रण कक्षातून केले जाईल. वाहनांना सूचना देण्यासाठी वॉकीटॉकीचा वापर केला जाणार आहे.

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न