शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाच्या दणक्यानंतर सरकारला जाग, अंबाझरी तलावासाठी उच्चस्तरीय समिती

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: December 21, 2023 19:20 IST

उच्च न्यायालयाने २१ मार्च २०१८ रोजी एक जनहित याचिका निकाली काढताना अंबाझरी तलावाला सुरक्षित करण्यासाठी विविध आदेश दिले होते.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी कानउघाडणी केल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले. सरकारने आज (गुरुवारी) उच्च न्यायालयामध्ये पूर्ण तयारीनिशी उपस्थित राहून अंबाझरी तलावाच्या सुरक्षिततेसह इतर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची आणि यासंदर्भात येत्या १२ जानेवारीपर्यंत आराखडा सादर करण्याची ग्वाही दिली.

उच्च न्यायालयाने २१ मार्च २०१८ रोजी एक जनहित याचिका निकाली काढताना अंबाझरी तलावाला सुरक्षित करण्यासाठी विविध आदेश दिले होते. त्यामध्ये धरण सुरक्षा संघटनेने अंबाझरी तलावाला सुरक्षित करण्यासाठी योजना तयार करावी, त्या योजनेची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, निधीची कमतरता आहे म्हणून योजनेतील कामे थांबविता येणार नाही, या आदेशांचे पालन करण्याची जबाबदारी मुख्य सचिवांची राहील यासह इतर काही आदेशांचा समावेश होता. त्यानंतर पाच वर्षे लोटून गेली, पण संबंधित आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली नाही. 

दरम्यान, गेल्या सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस आल्यामुळे अंबाझरी तलावाचे पाणी विविध वस्त्यांमध्ये शिरून हाहाकार माजला. परिणामी, न्यायालयाने ६ डिसेंबर २०२३ रोजी राज्य सरकारला फटकारून मुख्य सचिवांना यावर उत्तर मागितले होते. त्यानंतर प्रकरणावर २० डिसेंबर रोजी सुनावणी झाली. त्यावेळी मुख्य सचिवांच्या वतीने महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. न्यायालयाने त्यावर प्रचंड नाराजी व्यक्त करून ही सरकारची असंवेदनशीलता आहे, असे ताशेरे ओढले व याची गंभीर दखल घेऊन मुख्य सचिवांना समन्स बजावला होता व गुरुवारी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. करिता, सरकारने ठोस भूमिकेसह न्यायालयात हजर राहून ही ग्वाही दिली.

पुढील सुनावणी १७ जानेवारीलान्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांनी सरकारने दिलेली माहिती रेकॉर्डवर घेऊन या प्रकरणावर येत्या १७ जानेवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. अंबाझरी तलावातील पाण्यामुळे आलेल्या महापुरासंदर्भात रामगोपाल बाचुका व इतर तीन पीडित नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली आहे. अंबाझरी तलाव व नाग नदी परिसरातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्यात यावी, अंबाझरी तलाव किती सुरक्षित आहे, याचा अभ्यास करण्यात यावा इत्यादी मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. तुषार मंडलेकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालय