मिहान प्रकल्पापासून सिंचन प्रकल्पाची प्रगती, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, आदिवासी आणि वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीबाबतच्या योजनांचा समावेश आहे. यासंदर्भात तयारी करण्याच्या सूचना राजभवनाकडून प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. राज्यपाल यांचे मंगळवारी रात्री नागपूरमध्ये आगमन झाले. बुधवारी सकाळी ते अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याला ते भेट देणार असून, ७ नोव्हेंबरला ते नागपूर जिल्ह्याला भेट देणार आहे. याच दिवशी नागपूरमध्ये त्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक होण्याची शक्यता आहे.या विषयावर होणार चर्चा या बैठकीत राज्यपाल १४ विविध मुद्यांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने केंद्र सरकारच्या स्वच्छता भारत योजनेची अंमलबजावणी, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी, आदिवासी विकास योजनेचे नियोजन आणि अमल, विविध सिंचन योजनांची प्रगती, मिहान प्रकल्प, विद्युतीकरण, ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याची स्थिती, आदिवासी भागातील कुपोषण तसेच त्यांच्यासाठी उपलब्ध आरोग्य सेवेची सद्यस्थिती, शिक्षणाची सद्यस्थिती, स्थलांतर, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक भागातील स्वच्छतागृहांची सोय आणि जिल्ह्याचा विकास करण्यासाठी प्राथमिकतेने उचललेली पावले आदींचा त्यात समावेश आहे. या सर्व महत्त्वाच्या विषयांची मााहिती राज्यपाल कार्यालयाकडून मागविण्यात आली आहे.
राज्यपालांचे मिशन ‘विकास’
By admin | Updated: November 6, 2014 02:42 IST